निक जोनसची देवावर श्रद्धा, शुभकार्याआधी प्रियांकाला पूजा करण्याचा दिला सल्ला

Priyanka Chopra says hubby Nick Jonas asks her to do puja before starting anything big
निक जोनसची देवावर श्रद्धा, शुभकार्याआधी प्रियांकाला पूजा करण्याचा दिला सल्ला

इंटरनॅशनल आयकॉन प्रियांका चोप्रा आणि निक जोनस ही जोडी नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका आणि हॉलिवूड सिंगर निक जोनस ही जोडी चाहत्यांनीही अधिक आवडते. प्रियांका आणि निक इंस्टाग्रामवर नवनवीन पोस्ट शेअर करत त्यांच्या खासगी आयुष्यातील अपडेट फॅन्सला देत असतात. सोशल मीडियावर प्रियांका अनेकदा तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. मात्र लग्नानंतर अमेरिकेची सून बनलेली प्रियांका आजही अनेक हिंदू रुढी-परंपरा फॉलो करताना दिसते. अनेक नवनव्या फोटोंमधूनही ती भारतीय संस्कृतीचा गोडवा जगाला सांगत असते.

प्रियांका तिच्या सासरी विविध सणांनिमित्त पूजापाठ करताना दिसते. नवरात्रोत्सवानिमित्ताने देखील प्रियांकाने तिच्या घरी स्पेशल पूजा ठेवली होती. या पूजेत प्रियांका एकटीच नसून तिच्यासह पती निक जोनस देखील पूजा करताना दिसतोय. त्यामुळे निक जोनसालाही आता भारतीय रुढी-परंपरा आवडू लागल्या आहेत. याबाबत प्रियांकानेच खुलासा केला आहे. यावर प्रियांकाने सांगितले की, निक प्रत्येक शुभकार्याआधी मला घरात पूजा करण्याचा सल्ला देत असतो. त्यामुळे निक जोनस देखील आता भारतीय देव-देवतांवर श्रद्धा ठेवतोय.

सोना रेस्टॉरंट उघडण्यापूर्वी प्रियांकाने निकसोबत पूजा केली होती. यावेळी प्रियंका म्हणाली होती की, आम्ही दोघं दोन वेगळ्या धर्मांचे जरी असलो तरी आध्यात्मिक मुद्द्यांवर माझे आणि निकचे विचार नेहमी सारखेच असतात. विशेषत: जेव्हा आपल्या भावना, नातेसंबंध आणि विश्वासाचा प्रश्न येतो तेव्हा तरी. साहजिकच आम्ही वेगवेगळ्या विश्वासात लहानाचे मोठे झालो आहोत, पण माझा विश्वास आहे की, धर्म हा फक्त एक नकाशा आहे जो शेवटी आपल्याला एका ध्येयापर्यंत घेऊन जातो. शेवटी आपण सर्व एकाच दिशेने जाणार आहोत.

प्रियंका पुढे सांगते की, मला घरात नेहमी पूजापाठ करायला आवडते. मात्र जेव्हा काही आपण मोठं काम हातात घेतो तेव्हा निक मला आवर्जून पूजा करण्यास सांगतो. कारण त्याचप्रकारे मी माझ्या आयुष्यात नेहमी काहीतरी शुभ सुरू केले तेव्हा मी देवाचे आभार मानण्यासाठी एक प्रार्थना करत असते. मी अशाच कुटुंबात वाढवलेय.

अमेरिकेत राहूनही प्रियंका निकसोबत दिवाळी, होळी, करवा चौथसह सर्व हिंदू सण साजरे करते. निकगही तिच्यासोबत या सगळ्यात सहभागी होतो. प्रियंकाचा निकसोबत २०१८ मध्ये शाही थाटात लग्न झाले. दोघांनी अगदी ख्रिश्चन आणि हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केले. दोघांमधील प्रेमसंबंध दिवसेंदिवस अधिकच बहरत आहेत.