प्रियंका चोप्राने अभिषेक बच्चनचा फोन चोरत राणी मुखर्जीला केला असा मेसेज; संतापलेल्या राणीने दिले ‘हे’ उत्तर

priyanka chopra send message to rani mukherjee from abhishek bachchan mobile later angry rani made this reply
प्रियंका चोप्राने अभिषेक बच्चनचा फोन चोरत राणी मुखर्जीला केला असा मेसेज; संतापलेल्या राणीने दिले 'हे' उत्तर

बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री सिमी गरेवालने अलीकडेच तिच्या लोकप्रिय टॉक शो ‘रेंडेझ्वस विद सिमी गरेवाल’मधील तिच्या ‘आवडत्या’ क्षणांचा व्हिडिओ चाहत्यांसह शेअर केला होता. ही व्हिडीओ क्लिप त्या एपिसोडची आहे जेव्हा सिमीने तिच्या टॉक शोमध्ये प्रियांका चोप्राला होस्ट केले होते. व्हिडिओच्या सुरुवातीला सिमीने प्रियांकाला अभिषेक बच्चनशी संबंधित प्रश्न विचारला होता.

हा मुलाखतीचा व्हिडीओ त्यावेळचा आहे जेव्हा प्रियंका अभिषेक बच्चनसोबत तिच्या एका चित्रपटाच्या प्रमोशन करण्यासाठी सिमीच्या शोमध्ये हजर झाली होती. यात सिमीच्या अभिषेकसोबतच्या नात्याबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रियांकाने त्याला ‘वेडा’ म्हटले.

त्यानंतर सिमीने प्रियंकाला शूटिंगदरम्यान घडलेल्या एका घटनेबद्दल विचारले. सिमी प्रियंकाला विचारते की, “तु एकदा अभिषेकचा मोबाईल चोरला होता का?” यावर प्रत्युत्तरात प्रियंका हसली आणि म्हणाली, “आधी त्याने माझा फोन चोरी केला होता. त्या फोनवर तो चक्क बसला होता. अखेरीस तो यापुढे व्हॅनमध्ये बसू शकला नाही कारण त्याला बाहेर जायचे होते.”

यानंतर ती पुढे सांगते की, याचवेळी तिला अभिषेकचा फोन तिथेच पडून असल्याचे दिसले आणि तिच्यासोबत अभिषेक कसा वागला होता ते आठवले, म्हणून तिने या संधीचा लगेच फायदा घेतला. प्रियंकाने अभिषेकचा फोन पळवून नेला आणि लपवून ठेवला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Simi Garewal (@simigarewalofficial)


दरम्यान सिमी प्रियंका खोटे बोलत असं म्हणत तिने अभिषेकच्या फोनवरून कोणाला तरी मेसेज केला होता असा प्रश्न विचारते. यावर प्रियंका लगेच हा ला हा म्हणत खुलासा करते की, “मी अभिषेकच्या फोनवरून कोणाला तरी मेसेज केला… ‘मला तुझी आठवण येते, तू कुठे आहेस? तु मला पाहिजेस…” असं म्हणत प्रियंका चोप्रा खूप जोरात हसलू लागते.

यावर सिमी खुलासा करते की, प्रियंकाने त्यावेळी अभिषेक बच्चनच्या फोनवरून राणी मुखर्जीला मेसेज केला होता, ज्यावर राणीने अभिषेक बच्चनला उत्तर दिले. प्रियंकाने ती काय म्हणाली असे विचारल्यावर सिमी राणीची नक्कल करत म्हणाली, “हाय एबी, तुला काय झाले आहे?”

व्हिडिओच्या शेवटी, प्रियंका तिला या घटनेबद्दल कोणी सांगितले हे जाणून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे दिसते, ज्यावर सिमी उत्तर देते की, “ठीक आहे, मी बऱ्याच लोकांना ओळखते.” शेवटी प्रियांका म्हणते की, “मला खात्री आहे की, तो एबी आहे.” या व्हिडिओला सिमी आणि प्रियांकाच्या चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे.

स्टार वर्ल्डवर सिमी गरेवाल विथ रेंडेझ्वस हा टॉक शो प्रसारित व्हायचा. 1997 मध्ये सुरू झालेला हा शो पाच सीझनपर्यंत चालला तसेच अनेक सेलिब्रेटींना तो होस्ट केला होता.


‘JALSA’ मधील विद्या बालन आणि शेफाली शाहचा ‘फर्स्ट लूक’ आऊट