प्रियंका चोप्राने शेअर केला मालती मेरीचा नवा लूक

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’या हॉलिवूड वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. प्रियंका चोप्राच्या चाहत्यांनाही ही वेबसीरिज खूप आवडली. या वेबसीरिज व्यतिरिक्त प्रियंका चोप्रा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. सध्या प्रियंका आपल्या मुलीसह आणि पतीसह वेळ घालवत आहे. ज्याचे फोटो ती सतत सोशल मीडियावर शेअर करत असते.

मालती मेरी नव्या लूकमध्ये

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्यासोबत त्यांच्या मुलीचेही सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत असतात. नुकतेच प्रियंका चोप्राने मुलगी मालती मेरीचा एक नवीन फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मालती मेरीला प्रियंका चोप्राने उचलून घेतलं आहे. यात मालती मेरीने रेड फ्लॉवर्स असलेला क्यूट फ्रॉक घातला आहे आणि डोक्यावर रेड कॅप घातली आहे. प्रियंका चोप्राने देखील या फोटोमध्ये कॅप घातली आहे. प्रियंका चोप्रा आणि मालती मेरीचा हा फोटो तिचे चाहते सोशल मीडियावर प्रचंड शेअर करत आहेत.

या चित्रपटात दिसणार प्रियंका चोप्रा

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’ या वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. या वेबसीरीजनंतर आता प्रियंका चोप्रा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील दिसणार आहेत.

 


हेही वाचा :

आजच्या जोडप्यांमध्ये संयम… दीपिकाने सांगितलं सुखी वैवाहिक जीवनाचे रहस्य