Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन निक-प्रियांकाच्या नात्याला तीन वर्षे पुर्ण, रोमँटीक फोटो केले शेअर

निक-प्रियांकाच्या नात्याला तीन वर्षे पुर्ण, रोमँटीक फोटो केले शेअर

फोटोमध्ये निक आणि प्रियांका अतिशय रोमँटीक मुडमध्ये दिसत असून दोघांनी एकमेकांचा हात घट्ट पकडला आहे.

Related Story

- Advertisement -

 

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा  (Priyanka Chopra) आणि तिचा पती निक जोनस  (Nick Jonas) मोस्ट फेवरेट कपल्सपैकी एक ठरले आहेत. सोशल मीडियावर दोघांची भली मोठी फॅन फॉलोईंग असून दोघेही नेहमीच चाहत्यांसोबत अनेक व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत त्यांच्या व्यक्तीगत तसेच व्यावसायिक जीवनातील घडामोडी शेअर करत असताता. अशातच आता या लव बर्डची एक पोस्ट सध्या तूफान व्हायरल होत आहे. निक आणि प्रियांकाच्या नात्याला तीन वर्षे पुर्ण होत असून दोघांनी अगदी रोमँटीक अंदाजात एक स्पेशल फोटो शेअर करत पुन्हा एकदा त्यांच एकमेकांवर किती प्रेम आहे हे जगजाहीर केलं आहे. तसेच प्रियांकाने फोटोला कॅप्शन देत लिहलं आहे की,“ माझ्या साठी तू सर्व काही आहेस… आज तीन वर्ष पुर्ण झाली आहेत.. कधी कधी असे वाटते की कालचीच गोष्ट आहे. पण डोळे उघडताच जग बदललेले दिसते. माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे”  या रोमँटीक फोटोमध्ये प्रियांकाच्या हातात एक स्पेशल डायमंड रींग दिसत आहे.(priyanka chopra shares romantic photo with nick jonas to celebrate three years of togetherness)

- Advertisement -

याचदरम्यान निकने सुद्धा त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकांऊटवर एक थ्रोबॅक फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देत लिहलं आहे की ,“ तीन वर्षा पुर्वी”. प्रियांका आणि निकला अनेक दिग्गज कलाकारांनी शुभेच्छा दिल्या असून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by NICK JONɅS (@nickjonas)

- Advertisement -

नुकतच प्रियांकाने , १८ जुलैला ३९वा वाढदिवस साजरा केला होता. यानिमित्ताने निक जोनसने प्रियांकाला रेड वाईनची एक महागडी बॉटल गिफ्ट म्हणून दिली आहे. या गिफ्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार रंगत आहे.


हे हि वाचा – अभिनेत्री सविता बजाज यांच्या उपचाराकरीता सुप्रिया पिळगावकर यांचा मदतीचा हात

- Advertisement -