Priyanka Chopra बनणार आई! Nick Jonas सोबत करतेय फॅमिली प्लॅनिंग

मला आई व्हायचे आहे. देवाच्या कृपेने जेव्हा मुल होईल तेव्हा होईल मात्र मुलाच्या बाबतीत आम्ही कोणतीही घाई करणार नाही. कारण आई झाल्यानंतरही मला सिनेसृष्टीत भरपूर काम करायचे आहे. 

Priyanka Chopra talk about Family planning with Nick Jonas
Priyanka Chopra बनणार आई! Nick Jonas सोबत करतेय फॅमिली प्लॅनिंग

ग्लोबल अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra)  तिच्या प्रोफेशनल लाइफबाबत अनेक अपडेट तिच्या फॅन्सना देत असते. प्रियंका आणि निक जोनस ( Nick Jonas)  यांच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रियंका आणि निक यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी लोकांना फार उत्सुकता असते. दोघांनाही त्यांच्या कामाविषयी नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक प्रश्न विचारले जातात. एका मुलाखतीत प्रियंकाला फॅमिली प्लॅनिंगविषयी प्रश्न विचारण्यात आला. मुल होणे हा आयुष्यातील फार मोठा निर्णय आहे त्यासाठी आम्ही फ्यूचर प्लॅनिंग केले आहे असे उत्तर प्रियंकाने दिले.

प्रियंकाला आई व्हायचे आहे मात्र त्यासाठी तिला कोणतीही घाई नाहीये असे तिने सांगितले. वैनिटी फेयरला तिने दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटले की, फॅमिली प्लॉनिंग आणि मुले हा फार मोठा आणि महत्त्वाचा फ्यूचर प्लॉन आहे. त्यामुळे याबाबतीत आम्ही कोणतीही घाई करणार नाही. प्रियंका पुढे म्हणाली, मला आई व्हायचे आहे. देवाच्या कृपेने जेव्हा मुल होईल तेव्हा होईल मात्र मुलाच्या बाबतीत आम्ही कोणतीही घाई करणार नाही. कारण आई झाल्यानंतरही मला सिनेसृष्टीत भरपूर काम करायचे आहे.

प्रियंका आणि निक जोनस त्यांच्या कामाच्या बाबतीत फारच फोकस आहेत. त्यामुळे दोघेही सतत कामात व्यक्त असतात. दोघेही कामात व्यक्त असल्याचे आई वडील बनणे हे तुमच्या टू डू लिस्टमध्ये आहे का? असा प्रश्न प्रियंकाला विचारण्यात आला त्यावर प्रियंकाने उत्तरात म्हणले की, स्वत:चे घर घेणे आणि मुलं जन्माला घालणे या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी नेहमीच प्रायोरिटी आहेत. मी कामात व्यक्त असते परंतु मला माझ्या कुटुंबापासून दूर रहायला आवडत नाही. जी कामे मी केली नाहीत ती कामे करण्यासाठी मी आतूर आहे.

प्रियंकाने मुलाखतीत पुढे म्हटले, माझ्या आईला कधीही वाटले नव्हते की तिची मुलगी कधी लग्न करेल. तिने माझ्या लग्नाची आशाच सोडली होती. मात्र मी लग्न केल्याने ती आता फार आनंदी आणि समाधानी आहे.

याआधी देखील नेटफ्लिक्सच्या द जोनस ब्रदर्स फॅमिली रोस्ट मध्ये प्रियंकाने बेबी प्लॉनिंगविषयी सांगितले होते. प्रियंकाने म्हटले होते, जोनस यांच्या कुटुंबात आम्ही एकच असे कपल आहोत ज्यांना अजून एक मुल नाही. मात्र आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की आम्ही ही बेबी प्लॉनिंग करत आहोत. प्रियंकाच्या या खुलास्यानंतर तिच्या कुटुंबातील सर्व सदस्य फार खुश झाले होते.


हेही वाचा – Priyankaनं जपली परंपरा! डोक्यावर पदर घेत केली आरती, Unseen व्हिडीओ व्हायरल