घरमनोरंजनकबीर बेदीचे आत्मचारित्र ‘स्टोरीज़ आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द...

कबीर बेदीचे आत्मचारित्र ‘स्टोरीज़ आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द एक्टर’चे प्रियांका चोप्रा करणार प्रकाशन

Subscribe

कबीरच्या पुस्तकासाठी प्रियांका लंडनहून वर्चुअल पद्धतीने जोडली जाणार

अंतराष्ट्रीय स्तरावर नामांकित हिंदीतील दोन दिग्गज व्यक्तिमत्व, आपल्या आयुष्यात अभिनय करण्या बरोबरच एक लेखक सुद्धा बनले आहेत, आता कबीर यांच्या पुस्तकावर चर्चा करण्यासाठी आणि त्याचे अनावरण करण्यासाठी एकत्र येत आहेत, त्यांना एकाच मंचावर अनुभवणे, ही मोठी पर्वणी ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kabir Bedi (@ikabirbedi)

- Advertisement -

कबीरच्या पुस्तकासाठी प्रियांका लंडनहून वर्चुअल पद्धतीने जोडली जाणार असून त्याचा प्रीमियर एका मनोरंजन पोर्टल आणि कबीरच्या सोशल मीडियावर १९ एप्रिलला संध्याकाळी ६:३० वाजता होणार आहे.

कबीर आपल्या आत्मचारित्रातून पहिल्यांदाच लेखक म्हणून समोर येत आहेत,  एक आंतराष्ट्रीय  स्टार अभिनेत्री आणि मैत्रीण प्रियंकासोबत आपल्या पुस्तकाचे अनावरण करण्याबाबत अतिशय रोमांचित आहे. नुकतेच प्रियांकाने  देखील आपले आत्मचरित्र ‘अनफिनिश्ड’च्या रूपाने लेखक म्हणून पदार्पण केले आहे.”स्टोरीज आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द एक्टर” कबीर बेदी यांच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनातील उतार चढ़ावांबाबत, विवाह आणि घटस्फोटासोबत तुटणाऱ्या नात्यांची, बदलत्या विश्वासाची, त्याचे भयावह झटके यांसोबतच भारत, यूरोप आणि हॉलीवुडमधील रोमांचक दिवस आणि भारताला गौरवान्वित करण्याची कहाणी आहे. ही एका माणसाच्या घडण्याची, तुटण्याची आणि पुन्हा जुळण्याची कहाणी आहे.कबीर बेदी यांच्या “स्टोरीज़ आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द एक्टर” १९ एप्रिल २०२१ ला भारतातील ऑनलाइन आणि ऑफलाइन बुकस्टोर्समध्ये प्रकाशित होणार आहे.

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -