Priyankaनं जपली परंपरा! डोक्यावर पदर घेत केली आरती, Unseen व्हिडीओ व्हायरल

प्रियंका आणि तिची शेफ सॅम यांनी घरातील पूजा केली होती. यावेळी प्रियंकाच्या घरातील सर्व सदस्य, कर्मचारी पूजेला उपस्थित होते.

Priyanka chopra unseen video diwali aarti with her chef
Priyankaनं जपली परंपरा! डोक्यावर पदर घेत केली आरती, Unseen व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra)  सध्या नवरा निक जोनससह (Nick Jonas )  विदेशात राहत आहे. प्रियंका विदेशात जरी स्थायिक झाली असली तरी तिची भारताशी आणि तिथल्या परंपरा, संस्कृतीशी जोडलेली नाळ अद्याप कायम आहे. तिची पाळमुळं ती आजही विसरलेली नाही. विदेशात राहून प्रियंका भारतातील सण उत्सव साजरे करत असते. याचा पुरावा देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये प्रियंका छान साडी नेसून डोक्यावर पदर घेत आरती करताना दिसत आहे. तिच्यासोबत तिची शेफही आरती करताना दिसतेय तर निक जोनस देखील प्रियंकाच्या मागे उभा राहून आरतीत टाळ्या वाजवताना दिसत आहे. प्रियंकाचा हा व्हिडीओ पाहून तिच्या भारतीय चाहत्यांनी प्रियंकाविषयी अभिमान असल्याच्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. प्रियंका कितीही मोठी झाली तरी ती तिचा देश आणि संस्कृती विसरणार याची आम्हाला खात्री आहे असे म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jerry x Mimi 😍 (@jerryxmimi)

व्हायरल झालेला हा व्हिडीओ मागील वर्षी दिवळीतील असल्याचे सांगितले जात आहे. प्रियंकाच्या फॅन पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. प्रियंका आणि तिची शेफ सॅम यांनी घरातील पूजा केली होती. यावेळी प्रियंकाच्या घरातील सर्व सदस्य, कर्मचारी पूजेला उपस्थित होते.

बॉडीकॉन ड्रेसमध्ये Priyanka Chopra चा हटके ‘लेडी बॉस’ लूक

प्रियंकाने दिवाळीत झालेल्या या पूजेसाठी सुंदर पिवळ्या रंगाची साडी आणि त्यावर सिव्हलेस ब्लॉऊज घातला होता. निकने देखील पारंपरिक व्हाइट कलरचा पायजमा कुर्ता घातला होता. प्रियंका पूजा करताना आर्वजून डोक्यावर पदर घेताना दिसली. तिच्या या कृतीने तिने सर्वांची मने जिंकली.


हेही वाचा – Priyanka Chopra-Nick Jonas: एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा तर दुसरीकडे निकने शेअर केला प्रियंकासोबतचा रोमँटिक फोटो