घरमनोरंजन'या' गंभीर आजारातून वाचली प्रियांका चोप्रा, जाणून घ्या हा आजार कोणता आणि...

‘या’ गंभीर आजारातून वाचली प्रियांका चोप्रा, जाणून घ्या हा आजार कोणता आणि लक्षणे!

Subscribe

बॉलिवूडमधील अनेक कलाकार एकाबाजूला कॅन्सरशी दोन हात करत असतानाच अभिनेत्री प्रियांका चोप्राला देखील एक गंभीर आजार झाल्य़ाची माहिती समोर आली आहे. या आजाराबद्दल देसी गर्ल प्रियांका चोप्राने स्वत: माहिती दिली होती. प्रियांका अस्थमा अर्थात दमा या गंभीर आजाराने ग्रस्त होती. प्रियांकाने एक ट्वीट करत सांगितले की, वयाच्या ५ वर्षापासून मला अस्थमाचा त्रास आहे मात्र अस्थमा माझ्या स्वप्नांना थांबवू शकला नाही. मात्र या आजारातून प्रियांका आता सुखरुप बाहेर आली आहे. तसेच इतरांनाही ती अस्थमा आजाराबद्दल जनजागृक करतेय. मात्र प्रियांकाला झालेला हा आजार किती घातक आहे आणि याची लक्षणे काय आहेत जाणून घेऊ…

दमा हा आजार श्वसन यंत्रणेशी निगडीत आजार आहे, ज्यात रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होते. एकदा हा आजार झाला तर यातून सुटका मिळवणे कठीण आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्लानुसार या आजारावर नियंत्रण मिळवता येते. जगभरात दमाचे कोटीच्या घरात रुग्ण आहेत. तर भारतात १० व्यक्तीमागे १ रुग्ण अस्थमाग्रस्त असल्याचे म्हटले जाते.

- Advertisement -

दमा आजार नेमका आहे काय? 

दमा हा श्वसन यंत्रणेशी निगडीत आजार आहे. यात रुग्णाच्या श्वसननलिकेत सूज येते ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. या कारणाने छातीत योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही. श्वसन नलिकेत चिटक पदार्थ जमा होतो त्यामुळे श्वास घेण्यास अडचणी येतात. हा आजार कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकतो. विशेषत: वयस्कर लोकांना हा आजार अधिक प्रमाणात होतो. वाढत्या शहरीकरणामुळे आणि बदलत्या लाइफस्टाइलमुळे लहान मुलांमध्येही हा आजार वाढताना दिसतोय.

दम्याची लक्षणे नेमकी काय?

१) कफ असलेला खोकला किंवा कोरडा खोकला
२) जोरजोरात श्वास घेणे, यामुळे थकवा येणे.
३) श्वास घेण्यास त्रास होणे
४) छातीत भरुन आल्यासारखे होणे
५) श्वास घेताना छातीतून आवाज येणे
६) रात्री आणि सकाळी स्थिती गंभीर होणे
७) थंड्या हवेत श्वास घेतल्यावर त्रास होणे
८) व्यायाम करताना श्वास भरुन येणे

- Advertisement -

दमा आजार कसा समजतो?

सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशननुसार, एखाद्याला दमा आहे की नाही हे सांगणे कठीण आहे, विशेषतः ५ वर्षांखालील मुलांमध्ये. यासाठी तुमची फुफ्फुस किती चांगली काम करते हे तपासण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळोवेळी अॅलर्जी चाचण्या करा, यातून तुम्हाला दमा आहे की नाही हे शोधण्यात मदत मिळू शकते.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -