Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन प्रियंका चोप्राचा मोठा खुलासा! आई होण्यासाठी 30 व्या वर्षी गोठवलं होतं बीजांड

प्रियंका चोप्राचा मोठा खुलासा! आई होण्यासाठी 30 व्या वर्षी गोठवलं होतं बीजांड

Subscribe

प्रियंकाने आणखी एक मोठा खुलासा केला आहे. ज्यात तिने लग्नाच्याआधी वयाच्या 30 व्या वर्षी तिने तिचं बीजांड गोठवून घेतल्याचं सांगितलं आहे

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा विविध कारणांमुळे सतत चर्चेत असते. प्रियंका तिच्या प्रोफशनल आयुष्याव्यतिरिक्त पर्सनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. 2022 मध्ये प्रियंका सरोगसीच्या मदतीने आई झाली होती. ही बातमी जेव्हा तिने शेअर केली होती. त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. दरम्यान, आता अशातच प्रियंकाने आणखी एक मोठा खुलासा केला आहे. ज्यात तिने लग्नाच्याआधी वयाच्या 30 व्या वर्षी तिने तिचं बीजांड गोठवून घेतल्याचं सांगितलं आहे.

अलीकडेच प्रियंका चोप्राने डॅक्स शेफर्डला दिलेल्या मुलाखत दिली होती. यादरम्यान प्रियंका चोप्राने तिच्या आई होण्याच्या स्वप्नाविषयी खुलेपणाने सांगितले. प्रियंका चोप्राने सांगितले की, “मला नेहमीच मुलं खूप आवडतात. युनिसेफमध्येही मी मुलांसोबत बराच वेळ घालवला आहे. मला नेहमीच आई व्हायचे होते. कारण मुलांवर माझे प्रेम खूप आहे. वयाच्या 30 व्या वर्षी मी माझ्या आईच्या सांगण्यावरून माझे बीजांड गोठवले. माझी आई मधु चोप्रा, जी स्वत: एक प्रोफेशनल गायनॅकॉलॉजिस्ट आहे, तिच्या मते, 35 वर्षांनंतरच्या महिलांना आई होण्यासाठी खूप अडचणी येतात.

- Advertisement -

अशा परिस्थितीत मी संपूर्ण वैद्यकीय प्रक्रियेतून हे काम केले. त्यावेळी माझे लग्नही झाले नव्हते आणि शिवाय मी आणि निक जोनस एकमेकांना डेटही करत नव्हतो. बीजांड गोठवल्यानंतर मला बरं वाटलं. कारण मला त्यावेळी माझ्या करिअरमध्ये बरंच काही करायचं होतं.”

प्रियांका चोप्रा सरोगसीच्या माध्यमातून आई झाली

2018 मध्ये प्रियंका चोप्राने हॉलिवूड सुपरस्टार निक जोनाससोबत लग्न केले. जानेवारी 2022 मध्ये, लग्नाच्या 3 वर्षानंतर, प्रियंका चोप्रा सरोगसीद्वारे मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासची आई झाली. प्रियांका चोप्राने आरोग्याच्या समस्यांमुळे सरोगसीचा मार्ग स्वीकारल्याची माहिती आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘कथाविरहित व्हिडीओ गेमपेक्षा…’, शाहरुखच्या ‘पठाण’वर पाकिस्तानी लेखकाची टीका

- Advertisment -