Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा बिकिनीत क्रूझवर करतेय हॉलिडे एन्जॉय, पाहा हॉट फोटो

priyanka chopras most exotic bikini looks on cruise
Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा बिकिनीत क्रूझवर करतेय हॉलिडे एन्जॉय, पाहा हॉट फोटो

बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत स्वत:ची वेगळी छाप निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते. प्रियांकाने आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर हॉलिवूडमध्येही वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडची ही देसी गर्ल अनेकदा चाहत्यांची मनं जिंकत असते. सोशल मीडियावर नवनव्या फोटोंमधून ही चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या या फोटोंना चाहत्यांकडूनही पंसती दिले जाते.

नुकतचं प्रियांका चोप्राने एक प्रायव्हेड क्रूझवरील तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती अतिशय बोल्ड अंदाजात पोझ देताना दिसतेय. प्रियांका चोप्राची ही स्टाईल अनेकांना आवडली आहे. प्रियांका चोप्राने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोमध्ये वेगवेगळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. या तिच्या टोन्ड फिगरला प्लॉन्ट करताना दिसतेय. प्रियांकाने कूझवर वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून पोझ देत फोटो क्लिक केलेत.

प्रियांका चोप्राचा असा लूक चाहत्यांना क्वचितच पाहायला मिळतो. प्रियांकाने यापूर्वीही बोल्ड अंदाजात फोटोशूट केले असले तरी प्रत्येक फोटोमध्ये प्रियांका काहीतरी हटके स्टाईल चाहत्यांसाठी घेऊन येत असते. प्रियांकाने क्रूझवर धम्माल करण्याबरोबरचं वॉटर राईड्सचा देखील आनंद घेताना दिसली. प्रियांका यावेळी स्पीड राइडिंग करताना दिसली.

प्रियांका चोप्राच्या या फोटोवर पती निक जोनास देखील अधिक एक्साईट झाला आहे. निकने देखील प्रियांकाच्या या फोटोंवर कमेंट केली आहे. निकने कमेंटमध्ये लिहिले की, परफेक्ट सुट्टीचा दिवस.

दरम्यान, प्रियांका चोप्रा लवकरंच ‘सिटालेड’ या ‘स्पाय थ्रिरल’ सीरिजमध्ये झळकणार आहे. याशिवाय बॅरी लेविसनच्या ‘शीला’ या आध्यात्मिक सिनेमात ‘आनंद शीला’ यांची भूमिका साकरणार आहे. तर बॉलिवूडमध्ये फरहान खान दिग्दर्शित ‘जिले जरा’ या सिनेमात ती कतरिना कैफ आणि आलियासह झळकणार आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवत प्रियांकाने आता हॉलिवूडमध्ये यश मिळावले आहे.


Cruise drug bust: ऋतिक रोशनची आर्यनसाठी पोस्ट, म्हणाला …