निक जोनसपूर्वी ‘या’ अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं प्रियांका चोप्राचं नाव

प्रियांकाने बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली. मात्र, निक जोनससोबत लग्न होण्याआधी प्रियांकाचे नाव काही दिग्गज अभिनेत्यांसोबत जोडले जात होते.

बॉलिवूडची देसी गर्ल अशी ओळख असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा आज म्हणजेच १८ जुलैला तिचा ४०वा वाढदिवस साजरा करत आहे. मूळची उत्तर प्रदेशातील बरेली शहरात राहणारी प्रियांका चोप्रा आता बॉलिवूडपासून हॉलीवूडपर्यंत झेप घेतली आहे. प्रियांकाने वयाच्या १८ व्या वर्षी २००० साली विश्व सुंदरी होण्याचा मान पटकावला होता. त्यानंतर तिच्या यशस्वी वाटचालीला हळूहळू सुरूवात झाली. तसेच प्रियांकाने बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली. मात्र, निक जोनससोबत लग्न होण्याआधी प्रियांकाचे नाव काही दिग्गज अभिनेत्यांसोबत जोडले जात होते.

लग्नापूर्वी या अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं प्रियांकाचं नाव

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

 • असिम मर्चेंट
  चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी प्रियांकाचं नाव मॉडल आणि अभिनेता असिन मर्चेंटसोबत जोडले जात होते. मात्र, वारंवार त्या दोघांचं भांडण वाढत होते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी प्रियांका असिमपासून लांब गेली.
 • अक्षय कुमार
  मुझसे शादी करोगी , ऐतराज आणि ‘वक्तः रेस अगेंस्ट टाइम’ यांसारख्या चित्रपटात अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राने एकत्र काम केलं आहे. त्यावेळी त्या दोघांमधील केमिस्ट्रीच्या बातम्या ट्विंकल खन्नापर्यंत पोहोचल्या होत्या. त्यावेळी तिने अक्षयला प्रियांकासोबत चित्रपट करण्यास नकार दिला होता.
 • हरमन बावेजा
  हरमन बावेजाने २००८ मध्ये लवस्टोरी २०५० मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात प्रियांका सुद्धा मुख्य भूमिकेत होती. त्यावेळी दोघांचं नात असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
 • शाहिद कपूर
  करीना कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर शाहिद कपूरचं नाव प्रियांका कपूरसोबत जोडलं जात होतं. दोघांनी कमीने यासारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यावेळी मीडियामध्ये दोघांच्या नात्याची चर्चा चालू होती.
 • शाहरूख खान
  शाहरूख आणि प्रियांकाने डॉन चित्रपटात एकत्र काम केलं आहे. तेव्हा दोघांची केमिस्ट्री मीडियामध्ये चांगलीच व्हायरल झाली होती. ही बातमी शाहरूख खानच्या पत्नीला कळताच तिने प्रियांकाला घरी बोलावून शाहरूख पासून लांब राहण्याचा सांगितलं होतं. त्यानंतर प्रियांका शाहरूख खानपासून दूर गेली.

दरम्यान, २०१५ मध्ये प्रियांका चोपडाला अमेरिकन गायक निक जोनस याने प्रपोज केले होते, ज्यानंतर दोघं तीन वर्ष एकमेकांना डेट करत होते. २०१८ मध्ये जोधपूर येथे दोघांनी मोठ्या धूमधडाक्यात लग्न केलं. यंदा प्रियांका आणि जोनस जानेवारीमध्ये एका मुलीचे आई-वडील झाले आहेत.


हेही वाचा :कंगना रनौतपासून लारा दत्तापर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी साकारली आहे इंदिरा गांधी यांची भूमिका