घरमनोरंजनबहिणीचं लग्न सोडून कॉन्सर्टमध्ये दिसली प्रियंका; व्हिडीओ व्हायरल

बहिणीचं लग्न सोडून कॉन्सर्टमध्ये दिसली प्रियंका; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा काल (24 सप्टेंबर) रोजी अखेर विवाहबंधनात अडकले. पंजाबी पद्धतीने राजस्थानमधील उदयपूर येथे नातेवाईक आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. परिणीती राघवच्या लग्नाचे फोटो नुकतेच समोर आले आहेत. दरम्यान, परिणीतीच्या लग्नात देसी गर्ल प्रियंका चोप्रा देखील सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, काही कारणास्तव प्रियंका लग्नाला येऊ शकली नाही. यादरम्यान, प्रियंका एका कॉन्सर्टमध्ये व्यक्त असल्याचं म्हटलं जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bushra Khan 🇧🇩 (@b.khanfident)

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये प्रियंका एका कॉन्सर्टमध्ये दिसत आहे. प्रियंकाचा हा व्हिडीओ पाहून अनेकजण तू परिणीतीच्या लग्नाला का नाही गेलीस असा प्रश्न विचारत आहेत.

- Advertisement -

प्रियंकाने बहिणीसाठी लिहिलेला खास मॅसेज

प्रियांकाने तिच्या इंस्टा स्टोरीवर परिणीतीसाठी एक पोस्ट शेअर केली होती. आपल्या बहिणीचा फोटो शेअर करताना तिने लिहिलं होतं की, ‘मला आशा आहे की तू तुझ्या मोठ्या दिवशी आनंदी आणि समाधानी असशील… खूप प्रेम नेहमी.’

उदयपूरमध्ये पार पडलं लग्न

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे लग्न 23 आणि 24 सप्टेंबर रोजी राजस्थानच्या उदयपूर येथील लीला पॅलेस आणि द ओबेरॉय उदयविलास येथे पार पडले. या लग्नाला सुमारे 200 पाहुणे आणि 50 हून अधिक VVIP लोक उपस्थित होते.

- Advertisement -

 


हेही वाचा :

परिणीती-राघवच्या लग्न आणि रिशेप्शनचे फोटो व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -