बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा ‘गदर 2’ चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून आत्तापर्यंत या चित्रपटाने जवळपास करोडोंची कमाई केली आहे. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसत आहेत. बॉलिवूडचे दिग्गज कलाकार देखील या चित्रपटाचं प्रचंड कौतुक करत आहेत. ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा ते हेमा मालिनी यांनीही हा चित्रपट पाहिला आणि त्याचे भरभरून कौतुक केले. त्याचबरोबर आता प्रियंकानेही या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
प्रियंका आणि निक जोनसने देखील केलं ‘गदर 2’च कौतुक
Thx @priyankachopra and @nickjonas for your warm wishes … it really touched my heart #Gadar2 🙏❤️ pic.twitter.com/juPlHjc5TR
— Anil Sharma (@Anilsharma_dir) August 21, 2023
प्रेम चोप्रा आणि हेमा मालिनीनंतर आता प्रियंका आणि निक जोनस यांनी ‘गदर 2’चं कौतुक केलं आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी स्वतः ट्वीटरवरुन एक पोस्ट शेअर करत सांगितले आहे. अनिल शर्मा यांनी दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यातील पहिल्या फोटोमध्ये अनेक सुंदर फुले दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोत एक चिठ्ठी दिसत आहे, ज्यामध्ये प्रियंका आणि तिचा पती निक यांनी ‘गदर 2’ च्या यशाबद्दल दिग्दर्शकाचे अभिनंदन केले आहे .
‘गदर 2’ची जबरदस्त कमाई
अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’ चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल मुख्य भूमिकेत असून हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचे एकूण 375 कोटींची कमाई केली आहे.