घरमनोरंजनPriyanka Chopra :जेव्हा प्रियांकाच्या घरी पडली होती रेड...अनेक वर्षांनी सत्य समोर

Priyanka Chopra :जेव्हा प्रियांकाच्या घरी पडली होती रेड…अनेक वर्षांनी सत्य समोर

Subscribe

प्रियांका चोप्रा ही अभिनेत्री, गायिका आणि चित्रपट निर्माता आहे. प्रियांकाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. २००० मध्ये तिने मिस वर्ल्ड या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले होते. देसीगर्ल प्रियांका चोप्रा आता ग्लोबल आयकॉन झाली आहे. परदेशातही प्रियंकाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमेरिकन गायक निक जोनाससोबत प्रियांकाने लग्न केल्यापासून ती न्युयॉर्कमध्येच स्थायिक झाली आहे. मात्र ग्लोबल स्टार होण्याचा तिचा प्रवास सोपा नव्हता. तिला त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

प्रियांका चोप्राच्या घरावर छापा
2011 मध्ये आयकर विभागाने प्रियांका चोप्राच्या घरावर छापा टाकला होता. त्यावेळी शाहिद कपूरनेच आयटी अधिकाऱ्यांसाठी प्रियांकाच्या घराचा दरवाजा उघडला होता. ही बातमी सर्वत्र पसरली होती. ‘कमीने’ सिनेमात प्रियंका आणि शाहिद एकत्र दिसले होते, ज्यानंतर दोघांच्या अफेरच्या अफवा उडल्या होत्या.

- Advertisement -

आयकर विभागाच्या छाप्याबाबत केला खुलासा
प्रियांका चोप्राने “आप की अदालत” या शो मध्ये याबाबत खुलासा केला होता. ” छापा पडला हे सांगायला मला लाज वाटत नाही. आयकर विभाग हा अतिशय जबाबदार विभाग आहे. जर ही बातमी बाहेर आली आहे तर ती खरी आहे”. यानंतर रजत शर्मा घराचा दरवाजा कोणी उघडला असे विचारतात. ज्यावर प्रियांका म्हणते, “सामान्यतः जो आम्हाला आमच्या घरात मदत करतो तो दरवाजा उघडतो. माझ्या घरी काम करणाऱ्या मेडचं नाव रंजीता आहे”. ज्यावर रजत कपूर म्हणाले, “तुमच्या मेडचा चेहरा शाहिद कपूरसारखा आहे”. ज्यावर अभिनेत्री म्हणते, “मला एक वाटते की ज्या वृत्तपत्रात याबद्दल लिहिले आहे ते आयकर विभागासह माझ्या घरी आले असावे. दरवाजा कोणी उघडला हे त्यांनी पाहिले असेल”.

प्रियांका म्हणाली होती- शाहिद माझा मित्र
तुमच्याकडे ना पुरावा आहे आणि ना असे कधी घडले आहे. तुम्ही काही बिनबुडाच्या अफवांवर पहिल्या पानावर बातम्या बनवता, तुम्ही एका मुलीबद्दल बोलत आहात जी तिच्या पालकांसोबत राहते हे पूर्णपणे विसरून जातो. मी सुद्धा कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची बहीण आहे.” यादरम्यान प्रियंका चोप्राने सांगितले होते की, शाहिद कपूर तिच्या घराच्या अगदी जवळ राहतो. त्यावेळी प्रियांकाच्या घरापासून शाहिदचे घर 3 मिनिटांच्या अंतरावर होते. प्रियांकाने सांगितले होते की, तिची मोलकरीण रंजिता हिने आयकर अधिकाऱ्यांसाठी दरवाजा उघडला होता. छापा टाकला तेव्हा तिचे आई-वडील घरी नव्हते आणि कोणालाही घरापर्यंत पोहोचायला २० ते २५ मिनिटे लागणार होती, म्हणून मी जवळ राहणाऱ्या शाहिदला फोन केला.

- Advertisement -

प्रियांकाने २००२ मध्ये ‘थमिझन’ या तामिळ चित्रपटामध्ये काम करुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. २००३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’ हा चित्रपट प्रियांका चोप्राचा पहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. पुढे २००८ मध्ये तिचा ‘फॅशन’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी प्रियांकाला सर्वात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.  त्यानंतर तिने ‘बर्फी’ (२०१२), ‘मेरी कॉम’ (२०१४), ‘बाजीराव मस्तानी’ (२०१५) यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -