‘सिटाडेल’ सीरिजमधील प्रियांका चोप्राचा नवा लूक चर्चेत

priyanka chopra
प्रियांका चोप्रा

देसी गर्ल प्रियांका चोप्राने क्वांटिको या सीरिजमधून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सीरिजमध्ये ती प्रमुख भूमिकेमध्ये दिसली होती. पण काही सीझननंतर ही सीरिज बंद करण्यात आली होती. त्यानंतर प्रियांका अनेक हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये काम करताना दिसून आली. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा चांगलीच चर्चेत आहे. ती सध्या ‘सिटाडेल’ या स्पाय थ्रिरल सीरिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त असली तरी ती आपल्या चाहत्यांसह सीरिजमधील काही नव्या लूकचे फोटोस शेअर करत असते. नुकतीच तिने तिच्या लूकची एक झलक चाहत्यांसह शेअर केली असून या नवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

समुद्रकिनारी बंदूक घेऊन उभी असलेला फोटो प्रियांकाने तिच्या चाहत्यांसह शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शन दिलं, “ती एका योध्यासारखी आहे आणि तुम्हाला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे #BTS #सिटाडेल.” तिचा हा नवीन लूक बघून चाहते फिदा झाले आहेत. यामध्ये तिने एका स्पाय सारखा ड्रेस परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रियांका नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.ती तिच्या शूटचे अपडेट तिच्या फॅन्सना देत असते. अलीकडेच तिचे प्रायव्हेट जेटमधील काही फोटो व्हायरल झाले होते. यातील एका फोटोत तिने एक ब्लेझर आणि खाकी रंगाची पॅन्ट परिधान केली होती. प्रियांका तिच्या ‘सिटाडेल’ या आगामी वेब सीरिजसाठी इतर काही कलाकारांसोबत या जेटने स्पेनला जात असतानाचा फोटो तिने शेअर केला होता.