घरमनोरंजनरणदीप हुड्डाला महिला लेखिकेने पाठवली नोटीस, मागितली दहा कोटींची नुकसान भरपाई

रणदीप हुड्डाला महिला लेखिकेने पाठवली नोटीस, मागितली दहा कोटींची नुकसान भरपाई

Subscribe

प्रियांकाने गेल्या आठ वर्षापासून होणाऱ्या फसवणूकी बद्दल 10 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.

हिसारचे अधिवक्ता रजत कलसन यांच्यामार्फत हिसार निवासी स्क्रिप्ट,स्टोरी,लिरिक्स रायटर प्रियांका शर्माने अभिनेता रणदीप हुड्डावर (randeep hooda) गुन्हा दाखल केला आहे. प्रियांकाने हरियाणा पोलिस महानिर्देशक फरीदाबादमधील रेंज कमिश्नर यांच्या माध्यमातून रणदीपला नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये प्रियांकाने म्हटले आहे की, “मी एक स्क्रिप्ट रायटर असून. मी गेल्या काही वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून रणदीपशी संपर्क साधला होता. या सोबतच मी अनेक स्टोरी, साँग रणदीपला सेंड केली होती. यानंतर रणदीपने लवकरच आपण या स्टोरीजवर काम सुरू करु असे आश्वासन दिले होते. मी ईमेल,व्हाट्सअॅपवर रणदीपसह आशा हुड्डा, मनदीप हुड्डा, अंजलि हुड्डा, मॅनेजर मनीष, पंचाली चौधरी आणि मेकअप आर्टिस्ट रेणुका पिल्वाई यांना तब्बल 1200 गाणी आणि 40 स्टोरीज सेंड केली होती. अनेक वर्ष लोटली तरी माझ्या स्क्रिप्टवर काहीच काम सुरू झाले नाही. यांतर मी माझी स्क्रिप्ट पुन्हा मला सेंड करा यासाठी रणदीपला संपर्क साधला तर त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली.”  अधिवक्ता रजत कलसन यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियांकाने गेल्या आठ वर्षापासून होणाऱ्या फसवणूकी बद्दल 10 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. अद्याप अभिनेता रणदीप हूड्डाने या सर्व आरोपा बाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाहीये.(priyanka sharma has send notice to actor randeep hooda)

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

 रणदीपच्या वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास रणदीप नुकतच ‘राधे युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमात अभिनेता सलमान खान सोबत झळकला होता. रणदीपने साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेचं चाहत्यांनी तसेच समिक्षकांनी खूप कौतूक केलं होतं.

- Advertisement -

हे हि वाचा-  राखी सावंतचा नवा अवतार, ‘स्पायडर वुमन’ बनून बिग बॉसच्या घराबाहेर घातला गोंधळ…

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -