प्रियांका निकच्या लाडक्या लेकीला 100 दिवसांनंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत स्वताःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोपडा काही महिन्यांपूर्वी सरोगसीद्वारे आई झाली आहे. मदर्स डेच्या निमित्ताने प्रियांकाने तिच्या मुलीच्या फोटोची पहिली झलक सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली. त्यासोबतचं ती म्हणाली की, तिने तिच्या मुलीला पहिल्यांदा कुशीत घेतलं आहे.

प्रियांका आणि निकने सांगितले की, त्यांची मुलगी 100 दिवसांपेक्षा जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर आज पहिल्यांदा तिच्या घरी आली आहे. त्यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये प्रियांका आणि निक एकत्र असून प्रियांकाने तिच्या मुलीला मिठीत घेतले आहे. निक त्याच्या मुलीकडे खूप प्रेमाने बघत आहे. मात्र शेअर केलेल्या या फोटोमध्ये प्रियांकाने तिच्या मुलीच्या चेहऱ्यावर एक इमोजी ठेवून तिचा चेहरा झाकलेला आहे.

प्रियांकाने हा फोटो शेअर करत आई झाल्याचा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिने फोटोच्या खाली कॅप्शनमध्ये लिहिलं की, या मदर्स डेच्या खास दिवशी मला सांगायला आवडेल की, आम्ही मागील काही महिन्यांपासून एका खडतर प्रवास अनुभवला आहे. आम्हाला माहित आहे की, आमच्यासाखराच बऱ्याच लोकांनी हा अनुभव घेतला असेल. NICU मध्ये 100 दिवसांपेक्षा जास्त राहिल्यानंतर , आज आमची लहानगी परी घरी आली आहे. प्रत्येक कुटुंबाचा प्रवास वेगळा असतो, अशा कुटुंबात विश्वासाची गरज असते. आमचे मागील काही महिने आमच्यासाठी एक चॅलेंज होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाने पुढे लिहिलं की, आता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की प्रत्येक क्षण परफेक्ट आणि अनमोल आहे. आम्ही खूप खूश आहोत. कारण आमची मुलगी घरी आली आहे. आता आमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. MM(मालती मेरी) मम्मी आणि डॅडी तुझ्यावर खूप प्रेम करतात.

 


हेही वाचा :जवानांसाठी पहिल्यांदाच ‘भारत माझा देश आहे’ चित्रपटाच्या प्रिमिअर शोचं आयोजन