सनी लिओनची ‘ऐतिहासिक’ भूमिका, लोकांचा विरोध

सनी लिओनी 'वीरमादेवी' या तामिळ चित्रपटात साकारत असलेल्या मध्यवर्ती भूमिकेला, प्रो-कन्नड समूहाकडून जोरदार विरोध होत आहे.

pro-Kannada organisation protest against Sunny Leone being cast in film Veeramahadevi
फोटो सौजन्य- Suryan FM

आपल्या हॉट अदांनी बॉलीवूडमध्ये सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री सनी लिओनी, पुन्हा एकदा नव्या वादात फसली आहे. सनी लिओनी ‘वीरमादेवी’ या साऊथच्या चित्रपटामध्ये वीरमादेवीची मुख्य भूमिका साकारणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. वीरमादेवी चित्रपटाच्या निमित्ताने सनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत प्रवेश करणार असल्यामुळे तिचे चाहते अधिक उत्सुक होते. मात्र, सनी साकारणार असलेल्या वीरमादेवीच्या भूमिकेला काही कन्नड समूहांनी विरोध केला असल्याची बातमी समोर आली आहे. साऊथमध्ये सध्या सनी लिओनीविरोधात निदर्शनं केली जात आहेत. ‘सनीला वीरमादेवी या चित्रपटातून काढून टाका’ अशी मागणी काही स्थानिक समूहांकडून केली जात आहे. दरम्यान सनी लिओनीची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट, चोल साम्राज्याचे शासक पहिला राजेंद्र यांची पत्नी ‘वीरमादेवी’ यांच्या जीवनावर आधारित आहे. काही दिवसांपूर्वीच वीरमादेवी चित्रपटातलं सनीचं एक जबरजस्त पोस्टर रिलीज झालं होतं. सनीने स्वत: तिच्या ट्वीटर अकाउंटवरुन हे पोस्टर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.


वाचा: सनी लिओनीची घोड्यावरून तलवारबाजी


सनी विरोधात आंदोलनं

वीरमादेवी हे कर्नाटकातील एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे. या व्यक्तीमत्वासोबत कर्नाटकातील संस्कृती आणि शौर्याचा इतिहास जोडला गेला आहे. त्यामुळे चित्रपचटांमध्ये आक्षेपार्ह भूमिका साकारणाऱ्या सनी लिओनीने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारु नये, अशी मागणी काही समूहांनी केली आहे. विरोधकांनी आपल्या मागणीसाठी बंगळुरूमध्ये रॅली काढण्यात आल्या. याशिवाय सनीच्या फोटोंची होळी करुनही आंदोलनकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे. आता हे प्रकरण किती चिघळणार? सनी वीरमादेवीची भूमिका साकारणार का आणि सनीचे चाहते यावर काय प्रतिक्रिया देणार? हे येणारी वेळच सांगेल.