घरताज्या घडामोडीबॉलिवूडला तिसरा धक्का, प्रोड्यूसर्स गिल्डच्या सीईओचे निधन

बॉलिवूडला तिसरा धक्का, प्रोड्यूसर्स गिल्डच्या सीईओचे निधन

Subscribe

प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे CEO कुलमीत मक्कड यांचे निधन झाले आहे.

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खान यांचे बुधवारी वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक दशकं लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ऋषी कपूर यांचे गुरुवारी निधन झाले. या दोन घटनांमधून बॉलिवूड अद्याप सावरलंही नाही तोच बॉलिवूडला आणखी एक तिसरा मोठा धक्का बसला आहे. प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे CEO कुलमीत मक्कड यांचे निधन झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत चित्रपट निर्माता करण जोहर आणि अभिनेत्री विद्या बालनने याबाबत माहिती देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कुलमीत मक्कड यांच्याविषयी…

कुलमीत मक्कड हे काही वर्षांपूर्वी ‘सा रे गा मा’ आणि ‘रिलांयन्स एंटरटेनमेंट’ सारख्या कंपन्यांमध्ये काम करत होते. त्यानंतर २०१० मध्ये त्यांनी प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियामध्ये सीईओ म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.

- Advertisement -

कुलमीत मक्कड यांचे हार्ट अटॅकने मुंबईमध्ये निधन झाले असून करण जोहरने ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘कुलमीत तुम्ही प्रोड्यूसर गिल्डचे एक महत्त्वाचे व्यक्ती होतात. तुम्ही इंडस्ट्रीसाठी खूप काही केले आहे’, अशा अशयाचे ट्विट करत करणने कुलमीत यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, अभिनेत्री विद्या बालनने देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


हेही वाचा – अखेर आपल्या प्रिय मित्राबद्दल बोलले अमिताभ बच्चन!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -