‘केजीएफ ३’ चित्रपटाबाबत निर्मात्यांनी केली मोठी घोषणा

प्रशांत नील दिग्दर्शित ‘केजीएफ’च्या दोन्ही चित्रपटांनी बॉलिवूडला हादरवून टाकले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘केजीएफ २’ ने बॉक्स ऑफिसवर करोडोंचा गल्ला जमवला आहे. आतापर्यंत या चित्रपटने १ हजार १७० कोटींची कमाई केली असून बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा हा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.

या बहुचर्चित चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता केजीएफचे दिग्दर्शक या चित्रपटाचा तिसरा भाग घेऊन येणार असल्याची घोषणा त्यांनी सोशल मीडियावर केली होती. मात्र चित्रपटाच्या कार्यकारी निर्माते कार्तिक गोंडा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर सध्या तरी ‘केजीएफ 3’ ची शुटींग सुरु करण्याचा कोणताही प्लॅन नसल्याचे सांगितले.

निर्माता विजय यांनी सांगितले होते की, यावर्षी ऑक्टोबरमध्ये केजीएफच्या तिसऱ्या पार्टच्या शुटींगला सुरुवात होणार आहे. मात्र आता हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कार्तिक गोंडा यांनी केजीएफ चित्रपटाबाबत ट्विटरवर दिलेल्या माहितीमुळे चाहते निराश झाले आहेत. कार्तिक गोंडांच्या मते, केजीएफ आता २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

‘केजीएफ २’ चित्रपट जगभरातील तेलगु, तमिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम भाषेत १४ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता.

 


हेही वाचा :‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटाला प्रेक्षकांची ना पसंती; ३० टक्के शो कॅन्सल