घरमनोरंजनगोव्यातून दमण, सिल्वासाकडे चित्रीकरण करण्यासाठी निर्मात्यांच्या हालचाली सुरु......

गोव्यातून दमण, सिल्वासाकडे चित्रीकरण करण्यासाठी निर्मात्यांच्या हालचाली सुरु……

Subscribe

इंडियन फिल्म प्रोड्युसर्स कौन्सिल आणि चॅनल्स यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान चार महत्ताचे निर्णय घेण्यात आले.

कोरोनाचा वाढता प्रकोप आटोक्यात आणण्यासाठी राज्यसरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे अनेक मालिका आणि चित्रपटांचे शूटींग थांबवण्यात आले होते. मात्र काही नंतर महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण करण्याचा निर्णय अनेक निर्मात्यांनी घेतला. अनेक मालिका चित्रीकरणासाठी गोव्यात गेल्या आहेत. मात्र आता गोव्यातही चित्रीकरणावर बंदी आणण्यात आली आहे. गोव्यातील एंटरटेन्मेंट सोसायटीने गोव्यातल्या चित्रीकरणाच्या परवानग्या रद्द केल्यानंतर गोव्यात सुरु असलेल्या चित्रीकरणाला ही ब्रेक लागला. यानंतर आता आपण कुठे जायचं असा प्रश्न मालिकांच्या निर्मात्यांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन फिल्म प्रोड्युसर्स कौन्सिल आणि चॅनल्स यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान चार महत्ताचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत घेतलेले निर्णय असे होते की, चॅनल कोणत्याही निर्मात्याला चित्रिकरणासाठी सक्ती करणार नाही. निर्मात्याला चित्रिकरण थांबवून परतायचं असेल तर त्याला ती मुभा असेल. तरीही निर्माते चित्रिकरण करायला तयार असतील तर चॅनल्स त्यांना सर्व ते सहकार्य करेल. कोणाही कलाकाराला या चित्रिकरणात भाग घ्यायचा असेल वा काही कारणाने तो असमर्थ असेल तर त्याला चित्रिकरण थांबवून घरी जायची मुभा असेल. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर एकमत झालं. कोणावरही चित्रिकरणासाठी कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाहीय.

या बैठकीदरम्यानृ आणखी एक महत्वाचा मुद्दा विचारात घेतला गेला होता. तो म्हणजे कोव्हिड काळातल्या विम्याचा. पहिल्या लाटेच्यावेळी निर्मात्यांनी आपल्या युनिटचा विमा काढला होता. या कोव्हिड विम्यात कलाकार कोव्हिडने आजारी पडला तर 2 लाखाची तरतूद होती. त्यात दुर्दैवाने त्याचं निधन झालं तर 25 लाख रुपये त्याच्या कुटुंबियांना मिळणार होते. आता ही 2 लाखांची मर्यादा वाढवून 5 लाख करण्याच्या विचारात निर्माते आहेत. त्यासंदर्भात विमा कंपनीशी वाटाघाटी चालू असल्याची माहीती आयएफटीपीसीच्या सदस्याने दिली. याबद्दल लवकरच अधिकृत पत्रक देखील काढलं जाणार आहे. बैठक झाल्यानंतर लगेचच या बैठकीतले मुद्दे निर्मात्यांकडे शेअर करण्यात आले. त्यानंतर अनेक निर्मात्यांनी गोव्यातून आपला मोर्चा उंबरगाव, दमण, सिल्वासा या ठिकाणी नेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मुळात दमण, सिल्वासा इथे चित्रिकरणासाठी जागा आहेत का? राहायची व्यवस्था आहे का? याची चाचपणी सुरू आहे. येत्या दोन दिवसांत कोण कुठे चित्रिकरण करते आहे ते कळेल.

- Advertisement -

हे वाचा-  माधुरी दिक्षितने कोरोनापासून सुरक्षित राहण्याचा दिला फंडा,म्हणाली ‘या’ वस्तु घरी असणे गरजेचं…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -