‘Bhool Bhulaiya 2’ च्या घवघवीत यशानंतर निर्माते बनवणार ‘Kabir Singh’ चा दुसरा सिक्वेल

बॉलिवूडचा अभिनेता शाहिद कपूरने त्याच्या करिअरमध्ये एका पेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. त्याच चित्रपटातील कबीर सिंह चित्रपट सर्वाधिक हिट ठरला. 2019 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. शाहिद कपूर सोबतच या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी सुद्धा मुख्य भूमिकेत होती. ‘कबीर सिंह’ प्रेक्षकांची भरघोस प्रेम मिळाले होते. शिवाय शाहिद आणि कियाराची केमेस्ट्री सुद्धा भरपूर आवडली होती.

मात्र आता कबीर सिंहला रिलीज होऊन 3 वर्ष होऊन गेले. सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटाचे निर्माते लवकरच या चित्रपटाचा दूसरा पार्ट घेऊन येणार आहेत. खरंतर या चित्रपटाची निर्मीती मुराद खेतानी आणि भुषण कुमार यांनी मिळून केली होती. दरम्यान या दोघांनीही ‘कबीर सिंह’ चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेलबाबत चर्चा केली आहे.

कबीर सिंहचा दुसरा सिक्वेल कधी येणार?
खरंतर, 20 मे रोजी कार्तिक आर्यन आणि कियाराचा ‘भूल भुलैया 2’ रिलीज झाला होता. ज्याची निर्मिती मुराद खेतानी आणि भुषण कुमारने केली आहे. हा चित्रपट प्रेक्षाकांच्या पसंतीस उतरत आहे.

एका इंटरव्यूमध्ये त्यांना ‘भूल भुलैया 2’ नंतर दुसऱ्या कोणत्या चित्रपटाचा सिक्वेल काढायला आवडेल असं विचारल्यावर ‘भूल भुलैया 2’च्या यशानंतर दोन्ही निर्मित्यांनी कबीर सिंहचा दुसरा सिक्वेल आणण्याची इच्छा व्यक्त केली. इतकंच नव्हे तर निर्माते पुढे म्हणाले की, ते ‘भूल भुलैया 3’ सुद्धा आणू शकतात.याशिवाय मुरादा खेतानी ने म्हणाले की, भुषण कुमार यांना ‘आशिकी 3’ सुद्धा लवकर घेऊन यावं. ‘आशिकी 2’ चित्रपट 2013 मध्ये रिलीज झाला होता.

 


हेही वाचा :‘Khatron ke khiladi 12’ नंतर शिवांगी जोशी करणार ‘Bigg boss 16’ मध्ये एन्ट्री