घरमनोरंजनही तर सेलिब्रिटींची पसंती

ही तर सेलिब्रिटींची पसंती

Subscribe

हिंदी आणि मराठी अशा दोन्ही क्षेत्रांत सुमीत राघवन हा अभिनेता भक्कम पाय रोवून आहे. त्यातूनही मराठी नाटकाला वेळ द्यायचा म्हणजे तसे कठीण काम. आवड असेल तर सवड मिळतेच तसे काहीसे सुमीतचे झाले आहे. त्याचे हॅम्लेट हे नाटक सध्या जोरदार सुरू आहे. भव्यदिव्य नेपथ्य तशी तांत्रिक यंत्रणा असल्यामुळे केवळ एकच प्रयोग लावणे तसे अवघड. मग एकाच थिएटरमध्ये कमीतकमी दोन प्रयोग तरी लावावे लागतात. मग त्यासाठी कलाकारांनाच वेळ काढावा लागतो. अशा स्थितीत नॉक नॉक सेलिब्रिटी या नाटकाचे प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग करण्याचे ठरवले. सतत व्यस्त असलेली क्षीती जोग हीसुद्धा त्यात सहभागी झाली. ओंकार कुलकर्णी आणि मंदार देशपांडे या जोडगोळीने या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन केले. निर्माते म्हणून संतोष गुजराथी, मनोज पाटील, विजय केंकरे हे पुढे आले.

अर्थात नाटकाचे प्रयोग व्हावेत, नाटकात सातत्य रहावे अशी त्यापाठीमागे इच्छा होती. याच टीमने घरात मॅरिड बाहेर बॅचलर शिवाय रुद्रम आणि कट्टीबट्टी या मालिकांच्या निर्मिती प्रक्रियेत सहभाग असल्यामुळे नॉक नॉक सेलिब्रिटी या नाटकाची निर्मिती केली. प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला; पण प्रत्यक्ष जीवनात सेलिब्रिटी असलेल्या राजेश म्हापुस्कर, रोहिणी हट्टंगडी, शुभांगी गोखले, सुचित्रा बांदेकर, चिन्मय सुमीत, संहिता थत्ते, चिन्मय मांडलेकर, सागर देशमुख, अभिजीत खांडकेकर, संकर्षण कर्‍हाडे, उज्ज्वला जोग, कौशल इनामदार यांनी हिरवा कंदील दाखवून नाटकाचे प्रयोग झालेच पाहिजेत असा आग्रह धरला आणि निर्मात्याला पुढच्या काही तारखा घेण्यास भाग पाडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -