घरमनोरंजनPuneeth Rajkumar : कन्नड सुपरस्टार अभिनेता पुनीत राजकुमार यांच हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Puneeth Rajkumar : कन्नड सुपरस्टार अभिनेता पुनीत राजकुमार यांच हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Subscribe

कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता पुनीत राजकुमार यांच आज निधन झालं आहे. ते अवघे ४६ वर्षांचे होते. पुनीत यांना आज (२९ ऑक्टोबर) ह्रदयविकाराचा झटका आल्याने बंगळुरुतील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. पुनीत यांच्या निधनामुळे आता रुग्णालयाबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. क्रिकेटर Venkatesh Prasad यांनी ट्वीट करत पुनीत राजकुमार यांच्या निधनाची माहिती दिली आहे. सुपरस्टार पुनीत राजकुमार यांच्या निधनामुळे राज्यात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पुनीत यांना आज दुपारी १ ते १.३० च्या सुमारास ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना बंगळुरुतील विक्रम रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU)उपचार सुरु होते. रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर सतत नजर ठेवून उपचार करत होते. मात्र उपचारादरम्यान पुनीत यांचे निधन झाले आहे. पुनीत राजकुमार यांच्या निधनाची माहिती मिळताच चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे. तर सोशल मीडियावरही राजकुमार यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले जात आहे. सध्या ट्वीटवर तसेच सोशल मीडियावर पुनीत राजकुमार असा हॅशटॅग ट्रेंड होत असल्याचे पाहायला मिळतेय.

- Advertisement -

पुनीत राजकुमार हे कन्नड सुपरस्टार KFI शिवराज कुमार यांचा धाकडा मुलगा आहे. बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आत्तापर्यंत त्यांनी २९ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेट्टाडा हूवू’ चित्रपटातील अभिनयासाठी  त्यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय ‘चालिसुवा मोडागलू’(Chalisuva Modagalu) आणि ‘येराडू नक्षत्रगलू’ (Yeradu Nakshatragalu) या चित्रपटांसाठी त्यांना कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे.

२००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अप्पू’ चित्रपटामुळे पुनीत राजकुमार यांना अधिक लोकप्रियता मिळाली. चाहत्यांकडून त्यानंतर पुनीत यांना ‘अप्पू’ नावाने ओळखले जाऊ लागले. आतापर्यंत त्यांनी कन्नडमधील अभि, वीरा कन्नडिगा, अजय, अरासू, राम, हुदुगारू आणि अंजनी पुत्र अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. Yuvarathnaa हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -