अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुचर्चित चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता कुरळे ब्रदर्सची धमाल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर लवकरच पाहायला मिळणार आहे. अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव यांच्या जोडीला सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक आणि संजय नार्वेकर यांच्याही प्रमुख भूमिका यात आहेत. चित्रपटाच्या यशस्वी समारोपानंतर कलाकार आणि निर्मात्यांनी या चित्रपटाविषयीचा आपला उत्साह व्यक्त केला. (Punha Ekda Sade Made Teen movie shoot completed)
चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले असून, हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एक मोठी भेट ठरणार आहे. विशेष म्हणजे लोकशाही समूह अंतर्गत असलेले ईओडी मीडिया कंपनीचे संचालक पुष्कर यावलकर यांनी एव्हीकेसोबत हातमिळवणी करत मराठी चित्रपट निर्मितीक्षेत्रात आपले पहिले पाऊल ठेवले आहे. वयाच्या २५ व्या वर्षी निर्माता म्हणून ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ मध्ये महत्त्वाची भूमिका त्यांनी निभावली आहे. अमेय विनोद खोपकर पिक्चर्स (एव्हीके), उदाहरणार्थ निर्मित, प्रस्तुत या चित्रपटाचे सुधीर कोलते, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन निर्माते आहेत.
View this post on Instagram
दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणतात, ‘या चित्रपटाच्या सिक्वेलचा भाग होणे खूप खास आहे. याचे नुकतेच चित्रीकरण संपले असून चित्रीकरणाचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय होता आणि कलाकार, निर्मात्यांच्या मेहनतीने हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात नक्कीच यशस्वी होईल. प्रेक्षकांना ही नवी धमाल नक्कीच आवडेल’.
यावेळी बोलताना निर्माते पुष्कर यावलकर म्हणाले की, ‘अमेय खोपकर आणि निनाद बत्तीन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप खास होता. नुकतेच चित्रपटाचे शुटिंग संपन्न झाले असून या सगळ्या टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूप कमाल होता. चित्रपट निर्मितीक्षेत्रात पाऊल ठेवणे हा माझ्यासाठी एक मोठा प्रवास होता आणि तो या टीमसोबत खूप सुखकर झाला. ”पुन्हा एकदा साडे माडे तीन” सारख्या चित्रपटाचा भाग होणे, ही आनंदाची गोष्ट आहे’.
हेही पहा –
Oscars 2025 : ऑस्करमध्ये अनोराची बाजी, जाणून घ्या विजेत्यांची यादी