Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनPunha Kartavya Aahe : वसुंधरा तनयासमोर झुकणार? पुन्हा कर्तव्य आहे मालिकेत नवा ट्विस्ट

Punha Kartavya Aahe : वसुंधरा तनयासमोर झुकणार? पुन्हा कर्तव्य आहे मालिकेत नवा ट्विस्ट

Subscribe

झी मराठी वाहिनीवरील ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या मालिकेचे कथानक, संवाद आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडतोय. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेतील ट्विस्ट आकर्षणाचे कारण ठरत आहेत. मालिकेतील वसुंधरा आणि तनया या दोन पात्रांतील प्रसंग सध्या मालिकेचा टीआरपी वाढवण्यात यशस्वी ठरताना दिसत आहेत. सध्या या मालिकेत वसुंधरा तनयाला गृह कर्तव्यदक्ष बनवण्यासाठी मुद्दाम कठीण प्रसंग घडवून आणताना दिसतेय. पण यात आता आणखी एक नवा ट्विस्ट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. (Punha Kartavya Aahe Marathi Serial Promo Viral)

तनयाला गृह कर्तव्यदक्ष वसुंधरा तिला मातीच्या चुलीवर स्वयंपाक करायला लावते, हाताने कपडे धुवायला सांगते आणि एक परिपुर्ण गृहिणी व्हावी यासाठी तिच्यावर दबाव टाकते. मनात नसतानाही तनया स्वतःचं मन मारून हे सगळं करते. पण आपली संपूर्ण चिडचिड विशालवर काढते. थकून- भागूनही तनयाने एकटीनेच सर्व काही करण्याचा हट्ट धरते. दुसरीकडे, अवनी भास्करला मोठी स्वप्ने पाहायला लावते. त्याला फक्त हुकूमाचे पालन करणारा माणूस न राहता, स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला सांगते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

तनया वसुंधराकडून बारकावे शिकून घरातल्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतेय. पण या सततच्या तणावामुळे आणि निराशेच्या भरात तनया विशालसोबत वसुंधराला तोडीस तोड उत्तर देण्याची योजना आखते. पण तणावामुळे आणि थकव्यामुळे ती बेशुद्ध पडते. डॉक्टर तनयाला तपासतात आणि ती गरोदर असल्याचं सांगतात. इतकंच नव्हे तर तनयाला विशेष काळजी घ्यावी लागेल असंदेखील सांगतात. ही बातमी ऐकून संपूर्ण कुटुंब आनंदात आहे आणि याचा फायदा घेत तनया वसुंधराला ती जी काम करत होती ती सगळी काम करण्यास भाग पाडते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

तनया वसुंधराला माफीदेखील मागायला लावते. त्यामुळे आता ही दोघींमधली जुगलबंदी आणखी वाढणार की वसुंधरा तनयासमोर हत्यारं टाकून झुकतं माप घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आता या नव्या टप्प्यावर पोहोचलेली ही मालिका आणखी कोणकोणते ट्विस्ट घेऊन येणार हे पाहण्याची उत्सुकता वाढू लागली आहे. आता वसुंधरा आणि तनया दोघींपैकी कोण झुकणार? कोण स्वतःला सिद्ध करणार? काय आहे तनयाचा नवा प्लॅन? तनया खरंच गरोदर असेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर त्यासाठी तुम्हाला ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेचे आगामी भाग पहावे लागतील.

हेही पहा –

Vicky Kaushal : छावाच्या प्रमोशनसाठी विकी कौशलची मराठी मालिकेत एंट्री