घरताज्या घडामोडीPunjab Election 2022 : सोनू सूदला पंजाबचा स्टेट आयकॉन पदावरून हटवले; वाचा...

Punjab Election 2022 : सोनू सूदला पंजाबचा स्टेट आयकॉन पदावरून हटवले; वाचा काय आहे कारण?

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सोनू सूद हा कोरोनाच्या महामारीमध्ये संपूर्ण देशवासियांसाठी एक सुपरहिरो ठरला आहे. त्याने या काळात अनेक लोकांना मदत केली. कोरोना काळात शहराकडून खेड्याकडे पायी चालत जाणाऱ्या लोकांना त्याने मदत केली. त्याच्या या कृतज्ञतेचे संपूर्ण देशभरातून कौतुक करण्यात आले. दरम्यान, सोनू सूदला मोठा सन्मानही देण्यात आला होता.

गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकले होते. बॉलीवूड अभिनेता सोनू सूद हा कोरोनाच्या महामारीमध्ये संपूर्ण देशवासियांसाठी एक सुपरहिरो ठरला आहे. त्याने या काळात अनेक लोकांना मदत केली. कोरोना काळात शहराकडून खेड्याकडे पायी चालत जाणाऱ्या लोकांना त्याने मदत केली. त्याच्या या कृतज्ञतेचे संपूर्ण देशभरातून कौतुक करण्यात आले. दरम्यान, सोनू सूदला मोठा सन्मानही देण्यात आला होता. 2020 मध्ये निवडणूक आयोगाने सोनू सूदला पंजाबचे स्टेट आयकॉन पद बहाल केले होते.परंतु सोनू सूदला या पदावरुन हटवण्यात आले. त्याच्या चाहत्यांसाठी हा सर्वांत मोठा झटका होता.

- Advertisement -

भारताच्या निवडणूक आयोगोने हा निर्णय घेतला आहे की, सोनू सूद यापुढे पंजाब स्टेट आयकॉन राहणार नाही. जेव्हा सोनू सूदला ही पदवी देण्यात आली तेव्हा निवडणूक आयोगाने ‘लोकांचा खरा हिरो आता पंजाबचा स्टेट आयकॉन आहे – सोनू सूद’ असे ट्वीट केले होते.

- Advertisement -

अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद पंजाबच्या राजकारणात उतरली आहे आणि आता मालविका लवकरच पक्षात प्रवेश करेल अशी अपेक्षा आहे. खुद्द सोनू सूदने त्याची बहीण मालविका हिच्या राजकीय प्रवेशाची घोषणा केली होती. यादरम्यान त्यांनी दावा केला होता की, मी अद्याप राजकारणात येत नाही आणि माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. सोनू सूदच्या घोषणेनंतरच निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे.


हेही वाचा – 22.55 कोटी EPFO खातेदारकांच्या खात्यात व्याजाचे पैसे जमा; तुमच्या जमा झाले का? असे तपासा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -