Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन पंजाबी अभिनेता अमन धालीवालवर जीममध्ये अज्ञात व्यक्तीकडून हल्ला; व्हिडीओ व्हायरल

पंजाबी अभिनेता अमन धालीवालवर जीममध्ये अज्ञात व्यक्तीकडून हल्ला; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूडमधील ‘जोधा अकबर’ आणि ‘बिग ब्रदर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेले पंजाबचे प्रसिद्ध अभिनेते अमन धालीवाल यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेते अमन धालीवाल अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील जिममध्ये वर्कआउट करता असताना अचानक एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले आहेत. सध्या अमन धालीवाल यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अमन स्वतःवर हल्ला होत असताना स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हल्लेखोराने त्यांच्यावर अनेक हल्ले केले आहेत.

हा व्हिडीओ एका युजरने ट्वीटरवर ट्वीट केलं आहे. ही घटना अमेरिकेत सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. या व्हायरल व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने अमन यांचा हात धरला असून त्याच्या हातात कुऱ्हाड आहे. जीममध्ये अमन धालीवालवर हल्ला करणारा व्यक्ती मला पाणी पाहिजे असं म्हणताना दिसत आहे.

- Advertisement -

यादरम्यान, हा हल्लेखोर अमनला धमकावताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, हल्लाखोर व्यक्तीचं लक्ष इकडे-तिकडे होताच अमनने त्याला पटकन पकडले. त्यावेळी जीममधील इतर व्यक्ती देखील अमनची मदत करताना दिसत आहेत. त्यांनी हल्लेखोराला पकडून ठेवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. आणि अमनला तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

हिंदी आणि पंजाबी चित्रपटात केलंय काम

पंजाबचा प्रसिद्ध अभिनेता अमन धालीवालने 2003 मध्ये मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर 2007 मध्ये आलेल्या सनी देओलच्या ‘बिग ब्रदर’ चित्रपटात त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती.
या चित्रपटाशिवाय तो 2008 मध्ये आशुतोष गोवारीकरच्या ‘जोधा अकबर’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्यांनी राजकुमार रतन सिंगची भूमिका साकारली होती. हिंदी चित्रपट आणि पंजाबी चित्रपटांव्यतिरिक्त तो टीव्ही शोमध्येही दिसला आहे.


हेही वाचा :

कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा… आईच्या सर्जरीनंतर शिल्पा शेट्टीने शेअर केली भावनिक पोस्ट

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -