HomeमनोरंजनPushkar Jog : हार्दिक शुभेच्छा पण त्याचं काय? पुष्करच्या पोस्टने वेधलं लक्ष

Pushkar Jog : हार्दिक शुभेच्छा पण त्याचं काय? पुष्करच्या पोस्टने वेधलं लक्ष

Subscribe

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्दर्शक, निर्माते वेगवेगळ्या विषयांवर नवनवीन कलाकृती बनवताना दिसत आहेत. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या प्रयोगांना प्रेक्षकांकडूनदेखील चांगला प्रतिसाद मिळतोय. अशा दिग्दर्शकांच्या यादीत अभिनेता पुष्कर जोगच्या नावाचा समावेश आहे. एक अनोखा आणि वेगळा विचार घेऊन त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. अशातच आता पुन्हा एकदा पुष्कर एका अनोख्या विषयावर भाष्य करणारा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ असे असून याचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. (Pushkar Jog Shared Motion Poster Of Hardik shubheccha Movie)

‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’

पुष्कर जोगचा ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ हा चित्रपट लैंगिक सुसंगतता या विषयावर भाष्य करणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले असून यात एका नवविवाहित दांपत्य पाहायला मिळतंय. ही कथा प्रेक्षकांना नातेसंबंधातील एका महत्वाच्या पैलूशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MarathiStars (@marathistar)

हे पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘लग्न झालं म्हणजे सगळं झालं, असं कुठे असतं काय? ‘हार्दिक शुभेच्छा’.. पण त्याचं काय?? हार्दिक शुभेच्छा.. 21 मार्चपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात’. या चित्रपटात वैवाहिक जीवनातील लैंगिक सुसंगतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. त्यामुळे हा सिनेमा अत्यंत महत्वाच्या आणखी वेगळ्या विषयावर प्रेक्षकांशी संवाद साधणार आहे.

जबरदस्त स्टारकास्ट

या चित्रपटात पुष्कर जोग, हेमल इंगळे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर पूर्वी मुंदडा, विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, भरत सावळे आणि किशोरी अंबिये यांच्यादेखील महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत. पुष्कर जोगने याआधीदेखील असेच वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे चित्रपट प्रदर्शित केले आहेत. त्याच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणे यातही नात्यातील गुंतागुंत, भावनिक संघर्ष आणि जीवनातील काही कंगोरे मांडण्यात आले आहेत.

काय म्हणाला पुष्कर जोग?

पुष्कर जोगचे चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच विचार करायला भाग पाडतात आणि हा चित्रपटही त्या परंपरेतून तयार झाला आहे. या चित्रपटाचे शूटिंग दुबईसह ॲमस्टरडॅम आणि पॅरिसमध्ये करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे, ॲमस्टरडॅम आणि पॅरिसमध्ये चित्रित होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. याबाबत बोलताना अभिनेता आणि दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणाला, ‘आजच्या आधुनिक काळातही लैंगिक सुसंगतता हा विषय अनेकदा दुर्लक्षित केला जातो. नातेसंबंधांना फक्त भावनिक किंवा मानसिक बळ पुरेसं नसतं, तर शारीरिक सुसंगतता देखील तेवढीच महत्त्वाची आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही हा विषय एका सहज पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे’.

आनंद पंडित मोशन पिक्चर्स प्रस्तुत, गुझबम्प्स एंटरटेनमेंट यांच्या सहयोगाने ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ हा चित्रपट येत्या 21 मार्च 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन पुष्कर जोगने केले आहे. तसेच चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित, रुपा पंडित आणि पुष्कर जोग यांनी एकत्र केली आहे. चित्रपटाचे सहलेखन नमिष चापेकर यांनी केले आहे आणि पॅनोरमा स्टुडिओजने वितरणाची धुरा सांभाळली आहे.

हेही पहा –

Sania Mirza : घटस्फोटानंतर सानिया मिर्झाचा दुबईतील घराबाबत महत्वाचा निर्णय