सुपरस्टार अल्लू अर्जुन अभिनित ‘पुष्पा 2’ हा सिनेमा 5 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. प्रेक्षकांनी या सिनेमाला भरभरून प्रेम दिले. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 1800 करोड रुपयांचा गल्ला केला. यानंतर आता ‘पुष्पा 2’ ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे. मुख्य म्हणजे हा सिनेमा ओटीटीवर एक्स्टेंडेड व्हर्जनमध्ये रिलीज होईल. त्यामुळे ज्यांनी हा सिनेमा थिएटरमध्ये पाहिलाय तेसुद्धा ओटीटी रिलीजची वाट पाहत आहेत. चला तर जाणून घेऊया हा सिनेमा कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल? (Pushpa 2 movie will release on OTT)
‘पुष्पा 2’चे एक्स्टेंडेड व्हर्जन Netflix वर येणार
‘पुष्पा 2’ डिसेंबरनंतर पुन्हा जानेवारीमध्ये प्रदर्शित झाला होता. यावेळी सिनेमाचे रीलोडेड व्हर्जन 17 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आले. यानंतर आता 30 जानेवारी 2025 रोजी अर्थात उद्या हा सिनेमा लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
The man. The myth. The brAAnd 🔥 Pushpa’s rule is about to begin! 👊
Watch Pushpa 2- Reloaded Version with 23 minutes of extra footage on Netflix, coming soon in Telugu, Tamil, Malayalam & Kannada! pic.twitter.com/ZA1tUvNjAp— Netflix India (@NetflixIndia) January 27, 2025
याबाबतची माहिती नेटफ्लिक्सच्या अधिकृत सोशल मीडिया एक्स हॅण्डलवर शेअर करण्यात आली आहे. ज्यात लिहिलंय, ‘द माईन, मिथ, ब्रँड आणि पुष्पाचा रूल सुरु होणार आहे. नेटफ्लिक्सवर 23 मिनिटांच्या एक्स्ट्रा फुटेजसोबत बघा पुष्पा 2 – रीलोडेड व्हर्जन, जो लवकरच तेलुगु, तामिळ, मल्याळम आणि कन्नड़मध्ये येत आहे’.
रीलोडेड व्हर्जनमुळे वाढला सिनेमाचा रनटाईम
नेटफ्लिक्सने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये भले रिलीज डेटविषयी माहिती दिलेली नाही. पण रिपोर्टनुसार हा सिनेमा गुरुवारी (30 जानेवारी) ओटीटीवर स्ट्रीम होणार आहे. ‘पुष्पा 2’चे रीलोडेड व्हर्जन 23 मिनिटांनी वाढल्यामुळे सिनेमाचा रनटाईम 3 तास 20 मिनिटांऐवजी आता 3 तास 43 मिनिटे इतका झाला आहे.
हिंदी भाषिक प्रेक्षकांची निराशा होणार
‘पुष्पा 2’ नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय खरं पण केवळ दाक्षिणात्य भाषांमध्ये. त्यामुळे हिंदी प्रेक्षकांना हे रीलोडेड व्हर्जन पाहण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.
Pushpa ante fire kadhu…. he’s a wild fire 🔥
Watch Pushpa 2 on Netflix, coming soon in Telugu, Tamil, Malayalam & Kannada!#Pushpa2OnNetflix pic.twitter.com/TUAFovmzmX— Netflix India (@NetflixIndia) January 29, 2025
माहितीनुसार, या सिनेमाचे हिंदी व्हर्जन नेटफ्लिक्सवर येणार नाही. कारण यास सिनेमाच्या हिंदी व्हर्जनचे अधिकार अन्य ओटीटी प्लेटफॉर्मने विकत घेतले आहेत आणि येत्या काही दिवसात रिलीज डेटची घोषणा केली जाईल.
हेही पहा –
Deva Movie : शाहिद कपूरच्या देवा सिनेमाचे PVR, INOX मध्ये ॲडवांस बुकिंग सुरू