घरमनोरंजनरश्मिका मंदानाने सांगितला तिच्या स्वप्नातील 'राजकुमार'

रश्मिका मंदानाने सांगितला तिच्या स्वप्नातील ‘राजकुमार’

Subscribe

‘नॅशनल क्रश’ असलेली दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. टॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी ती एक आहे. नुकतचं अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ सुपरहिट झाल्याने त्याच्या फॅन फॉलोइंगमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. चित्रपटांसोबतच रश्मिका वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असते. ‘अर्जुन रेड्डी’ फेम अभिनेता विजय देवरकोंडा याला ती डेट करत असल्याची चर्चा सुरु होती. परंतु दोघांनी आम्ही चांगले मित्र-मैत्रीण असल्याचे म्हणत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अशातच आता अभिनेत्रीने प्रेम आणि नातेसंबंधांवर खुलेपणाने बोलली आहे. तसेच तिने तिच्या स्वप्नातील ‘राजकुमार’ बद्दलही भाष्य केलं आहे.

एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना रश्मिका मंदाना म्हणाली की, ‘माझ्या मते प्रेम तेव्हा होऊ शकते जेव्हा तुम्ही एकमेकांचा आदर करता, वेळ देता आणि एकमेकांसोबत सुरक्षित असल्याचे अनुभवता. प्रेमाचे वर्णन करणे कठीण आहे कारण ती एक भावना आहे. प्रेम तेव्हाच काम करते जेव्हा ते दोन्ही बाजूंनी असते, फक्त एका बाजूने नाही.’

- Advertisement -

लग्नाबाबत बोलताना रश्मिका म्हणते की, याबद्दल काय विचार करावा हे माहित नाही, कारण मी सध्या यासाठी खूप लहान आहे. मी याचा विचार केला नाही, परंतु ती अशी व्यक्ती असावी जी मला सहज समजून घेईल.

रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास ती लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती ‘मिशन मजनू’ चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुड बाय’मध्येही दिसणार आहे. दुसरीकडे विजय देवरकोंडा ‘लिगर’ या चित्रपटावर ती काम करत आहे, ज्यात अनन्या पांडे देखील आहे.

- Advertisement -

रश्मिका मंदानाचा ‘गुडबाय’ या वर्षी रिलीज होणार आहे, परंतु रिलीजची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. तिच्या करियरमधील पुष्पा सर्वात सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रचंड यश मिळाले असून आता चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. हा चित्रपट या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.


‘फत्तेशिकस्त’ फेम अभिनेता हरीश दुधाडेचं निर्मिती क्षेत्रात पाऊल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -