‘ही’ आहे Pushpa ची खरी श्रीवल्ली, वाचा त्यांची लव्ह स्टोरी

मास्टर्स करण्यासाठी ती अमेरिकेला गेली होती. मास्टर्स करुन स्नेहा भारतात येई पर्यंत इथे अल्लू अर्जुन साउथचा सुपरस्टार झाला होता.

pushpa fame actor allu arjun wife sneha reddy love story
'ही' आहे Pushpa ची खरी श्रीवल्ली, वाचा त्यांची लव्ह स्टोरी

पुष्पा द राइज (Pushpa The Rise)  हा सिनेमा सध्या सर्वत्र धुमाकूळ घालतोय. अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana)  यांची जबरदस्त केमिस्ट्री सिनेमात प्रेक्षकांना पहायला मिळाली. अल्लू अर्जुन म्हणजे पुष्पा त्यांच्या श्रीवल्लीच्या प्रेमात आहे हे आपण पाहिलेच मात्र या सगळ्यात अल्लू अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातील श्रीवल्लीची देखील सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. अल्लू अर्जुन आणि त्याची पत्नी स्नेहा रेड्डी (Sneha Reddy )   यांची सध्या चर्चा सुरू आहे.

अल्लू अर्जुनने नुकताच इन्स्टाग्रावर 15 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. 15 मिलियन फॉलोअर्स असलेला अल्लू अर्जुन इन्स्टाग्रामवर केवळ एका व्यक्तीला फॉलो करतो ती म्हणजे त्याची पत्नी स्नेहा रेड्डी.स्नेहा देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. स्नेहाचे इन्स्टाग्रामवर 6.9 मिलियन्स फॉलोअर्स आहेत. ती नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी तिथे शेअर करत असते. नुकतीच तिने गोवा डायरीजचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Sneha Reddy (@allusnehareddy)

अल्लू आणि स्नेहा हे क्यूट कपल एकमेकांवर खूप प्रेम करतात. दोघांनी प्रेम विवाह केल्याने त्यांच्यातील केमिस्ट्री प्रत्येक वेळी दिसून येते. अल्लू आणि स्नेहा यांची पहिली भेट एका मित्राच्या लग्नात झाली होती. स्नेहा आणि अल्लू पहिल्या भेटीतच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. स्नेहा त्यावेळी तिची मास्टर्स डिग्री पूर्ण करत होती. मास्टर्स करण्यासाठी ती अमेरिकेला गेली होती. मास्टर्स करुन स्नेहा भारतात येई पर्यंत इथे अल्लू अर्जुन साउथचा सुपरस्टार झाला होता. स्नेहा ही हैद्राबादमधील एका प्रसिद्ध बिझनेसमॅनची मुलगी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Sneha Reddy (@allusnehareddy)

अल्लूने जेव्हा स्नेहा आणि त्याच्या नात्याविषयी तिच्या वडिलांना सांगितले तेव्हा स्नेहाच्या वडिलांनी त्यांच्या नात्याला विरोध केला होता. मात्र स्नेहा आणि अल्लू एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नव्हते. बऱ्याच विरोधानंतर अखेर स्नेहाचे वडील त्यांच्या लग्नाला तयार झाले. आणि अल्लू आणि स्नेहाने 6 मार्च 2011मध्ये लग्न केले.


हेही वाचा – गणेश आचार्यची Oo Antava वर हुक स्टेप पाहून अल्लू अर्जुन अन् समांथाचा तूफान लाफ्टर