HomeमनोरंजनPyramid Webseries : गुन्हेगारीचे गूढ उलगडणारी 'पिरॅमिड'

Pyramid Webseries : गुन्हेगारीचे गूढ उलगडणारी ‘पिरॅमिड’

Subscribe

हंगामा ओटीटी हा भारतातील आघाडीचा डिजिटल मनोरंजन मंच आहे. आता हाच मंच क्रिप्टोकरन्सी आणि गुन्हेगारीच्या गूढ जगात प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी पिरॅमिड ही आपली नवीन ओरिजिनल वेबसीरिज घेऊन येत आहे. हंगामा ओटीटीवरून प्रदर्शित होणारी ही वेब सीरिज रहस्य, रोमांच आणि थरारक कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे.

हेली शाह, रोहन मेहरा, हर्षद अरोरा, करण शर्मा आणि क्रिसन बरेटो या प्रतिभावान कलाकारांच्या सहभागाने सजलेली ही वेब सिरीज अर्जुन बॅनर्जी यांच्या खळबळजनक हत्येचा तपास उलगडते. अर्जुन हा पिरॅमिड नावाच्या क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्मचा निर्माता आहे. त्याच्या अचानक मृत्यूमुळे लाखो लोकांचे खाते ब्लॉक होते. आणि त्यातूनच सुरू होते अनेक प्रश्नांची मालिका. ज्या प्रश्नांचा शोध या वेबसीरिजमधून घेतला जाणार आहे.

पत्रकार वृंदा (हेली शाह) या घटनेतील सत्य शोधण्यासाठी तपास करत असते. या तपास प्रवासात तिला फसवणूक, विश्वासघात आणि अनेक रहस्यांचा सामना करावा लागतो. तिचा सत्यशोध तिला एका धोकादायक मार्गावर नेतो, जिथे प्रत्येक वळणावर धोका असतो आणि प्रत्येक गोष्ट तितकी सोपी नसते जितकी ती दिसते.

हंगामा डिजिटल मीडियाचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक नीरज रॉय म्हणाले की, “पिरॅमिड ही हंगामाच्या ओरिजिनल कंटेंट पोर्टफोलिओमध्ये भर घालणारी आणि एका महत्त्वाच्या विषयाला एका थरारक कथानकासोबत जोडणारी एक महत्त्वपूर्ण निर्मिती आहे. क्रिप्टोकरन्सी जागतिक अर्थव्यवस्थेला नवा आकार देत असताना, ही मालिका त्याच्या गडद बाजूंवर प्रकाश टाकते आणि प्रेक्षकांना एक रोमांचक अनुभव देते. सणासुदीच्या काळात पिरॅमिड ही वेब सिरीज सादर करताना आम्हाला आनंद होत असून या माध्यमातून प्रेक्षक एक आकर्षक कथा अनुभवू शकतील असा विश्वास आम्हाला वाटतो.”

पिरॅमिडचे दिग्दर्शक नितीश सिंग यांनी आपल्या दृष्टीकोनाबद्दल सांगितले की, “पिरॅमिडचे दिग्दर्शन हा एक अद्भुत प्रवास होता. ही वेब सिरीज एका वेगाने बदलणाऱ्या डिजिटल जगाचं दर्शन घडवते. तसेच मानवी लालसा, विश्वासघात आणि जिद्द या संकल्पनांचंही बारकाईने परीक्षण करते. प्रत्येक पात्र हे वेगळे आहे. ते आपल्या भूमिकेने कथानकाला समृद्ध करते. आणि प्रेक्षकांना या गुंतागुंतीच्या व थरारक जगातील अनेक पदर त्यामुळे तुम्हाला अनुभवायला मिळतील. मला विश्वास आहे की प्रेक्षक या आकर्षक प्रवासाचा आनंद नक्की घेतील.”

अर्जुनचे पात्र साकारलेले हर्षद अरोरा यांनी सांगितले की, “पिरॅमिडचा भाग असणे हा माझ्यासाठी एक अद्भुत अनुभव ठरला आहे. अर्जुनचे पात्र रहस्याच्या केंद्रस्थानी आहे आणि त्याची कथा महत्वाकांक्षा, नावीन्य आणि त्याच्या अकाली मृत्यूनंतरच्या गोंधळाची आहे.”

क्रिसन बरेटो यांनी आपल्या भूमिकेबद्दल सांगितले की, “पिरॅमिडने मला अनिश्चितता आणि धोका यांनी भरलेल्या जगात जगणारे नकारात्मक व आव्हानात्मक पात्र साकारण्याची संधी मिळाली. वेब सिरीजमधील गुन्हेगारी थराराचा पैलू खरोखरच वेगळा असून आम्ही जीव तोडून साकारलेले हे रहस्य व नाट्यमय वळणांनी भरलेले कथानक उलगडताना पाहणे प्रेक्षकांसाठी रोमांचक असेल.”

करण शर्मा यांनी सांगितले की, ” या प्रकल्पाचा भाग होणे खूप समाधानकारक होते, आणि प्रेक्षक मालिकेतील खिळवून ठेवणारी नाट्यमय वळणे व ट्विस्ट नक्कीच एन्जॉय करतील.”

दरम्यान, हंगामा ओटीटी आपल्या मासिक सबस्क्रिप्शनवर 25% सूट देत असून यामुळे प्रेक्षकांना प्रीमियम कंटेंट कमी किंमतीत पाहता व अनुभवता येतील. पिरॅमिड ही वेब सिरीज हंगामा आणि टाटा प्ले बिंगे, वाचो, बीएसएनएल, प्लेबॉक्स टिव्ही, रेलवायर ब्रॉडबँड, अलायांस ब्रॉडबँड, मेघबेला ब्रॉडबँड, एसीटी फायबरनेट, एअरटेल एक्सट्रिम प्ले आणि डोर टिव्ही या मंचावरून स्ट्रीम होत आहे.

हेही वाचा : Chhaya Kadam : अभिनेत्री छाया कदमचा ग्लॅमरस अंदाज


Edited By – Tanvi Gundaye