हिंदी टेलिव्हिजन विश्वाची Queen

हिंदी टेलिव्हिजन विश्वात निर्मिती क्षेत्रात गेली अनेक वर्षे यशश्वीरित्या वाटचाल करणार निर्माती एकता कपूर हिचे मालिका विश्वात एक मोठं योगदान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून १३० पेक्षा अधिक मालिकांची निर्मिती एकता कपूरने प्रेक्षकांसाठी केली. एकता कपूरची प्रत्येक मालिका ही प्रेक्षकांमध्ये हिट ठरली आहे.

Ekta Kapoor, the producer known as QUEEN of Hindi Television

छोटया पडद्यावरील मालिका विश्वात गेली अनेक वर्षे अधिराज्य गाजवणारी निर्माती म्हणजे एकता कपूर. छोट्या पडद्यावर एकता कपूरच्या (ekta kapoor) प्रत्त्येक मालिकेला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. एकताच्या आजवरच्या गाजलेल्या मालिका आणि एकताच्या या टेलिव्हिजनच्या प्रवासाचा आढावा घेऊया, एकताने तिच्या वयाच्या १५ व्या वर्षी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. कैलाश सुरेंद्रनाथ यांच्या जाहिरात आणि चित्रपट निर्मिती कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्याचदरम्यान एकताने निर्मिती क्षेत्रात सुद्धा पदार्पण केले होते. पण त्यावेळी मात्र तिला अपयश आले. पहिल्या अपयशानंतर एकताने तिच्या वडिलांच्या सल्ल्यानुसार स्वतःची स्वतंत्र निर्मिती कंपनी स्थापन करणायचा निर्णय घेतला. त्यानंतर १९९४ मध्ये एकताने (ekta kapoor) तिच्या वडिलांच्या मदतीने ‘बालाजी टेलिफिल्म्स’ (balaji telefilms) या कंपनीची स्थापना केली. मालिकांच्या निर्मिती क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘बालाजी टेलिफिल्म’ (balaji telefilms) या आपल्या स्वतंत्र प्रोडक्शन हाऊस अंतर्गत एकताने आत्तापर्यंत १३० पेक्षा अधिक मालिकांची निर्मिती केली आहे आणि म्हणूनच टेलिव्हिजनची क्विन (Queen of televidion) असे एकताला म्हटले जाते. तिच्या सर्वच मालिकांना आजतागायत प्रेकक्षकांची सुद्धा उत्तम पसंती मिळाली आहे.

१) हम पांच 

झी टीव्ही वरील हम पांच ही मालिका प्रेक्षक आजही विसरू शकत नाहीत. या मालिकेची महत्वाची गोष्ट म्हणजे या मालिकेत एकही पुरुष नायक नव्हता. पाच मुलींन भोवती फिरणारी ही कथा प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिट ठरली होती. या पाच मुलींमध्ये असहाय्य पणे अडकलेल्या वडिलांची भूमिका जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी साकारली होती. १९९५ ला सुरु झालेली हि मालिका १९९९ पर्यंत टेलिव्हिजन वर प्रेक्षक उत्तम प्रतिसादात पाहत होते.

२) जोधा अकबर 

२०१३ ते २०१५ या कालावधीत एकता कपूरची निर्मिती असलेली ‘जोधा अकबर’ ही मालिका सुद्धा प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिट झाली होती. आमेर कुवरी जोधा आणि मुघल बादशहा अकबर यांची कथा या मालिकेत दाखविण्यात आली होती. या मालिकेतील कलाकारांचा अभिनय आणि एक ऐतिहासिक कथा रंजक पद्धतीने दाखविण्यात आली होती. या मालिकेत रजत टोकस आणि परिधी शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही मालिका सुद्धा हिट ठरली होती.

३) क्यूंकी सास भी कभी बहू थी 

क्यूंकी सास भी कभी बहू थी ही मालिका सुद्धा कायमच प्रेक्षकांच्या स्मरणात राहील. या मालिकेपासूनच सासू आणि सुनेच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या मालिकांचा एक मोठा ट्रेंड सुरु झाला. २००१ ते २००५ या कालावधीत या मालिकेने सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून ‘इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार’ सुद्धा पटकावला होता. या मालिकेचे १८०० पेक्षा जास्त भाग प्रदर्शित झाले अजून या मालिकेतील प्रत्येक व्हायक्तिरेखा ही प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे.

४) कहानी घर घर की 

क्यूकी सास भी कभी बहू थी आणि कहानी घर घर की या दोन्ही मालिका साधारण एकाच वेळी सुरु झाल्या होत्या. अभिनेत्री साक्षी तन्वर हीला या मालिकेमुळे एक नवी ओळख मिळाली होती. या मालिकेमधून बाहिनेत्री साक्षी तन्वर यशाच्या शिखरावर पोहोचली होती. हि मालिका ८ वर्षे अविरत सुरु होती. या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांचा उत्तम प्रदिसाद मिळाला होता.

५) नागिन

एकता कपूरच्या आजवरच्या अनेक मालिका या सुपर हिट ठरल्या आहेत. पण या सगळ्यातच सध्या टीव्ही वर एकता कपूरची निर्मिती असलेली ‘नागीन’ ही मालिका सुरु आहे. या मालिकेमधून एकताने तिच्या आत्तापर्यंतच्या मालिकेचा ठराविक साचा मोडत एक वेगळा प्रयोग केला आहे. आणि आता या मालिकेचा ६ वा सिझन सुरु आहे. हि मालिका २०१५ मध्ये सुरु झाली होती या हि मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

एकताने (ekta kapoor)आत्तापर्यंत अशाच हिट मालिका दिल्या आहेत. तिच्या प्रत्येक मालिकेत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.