Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'तु खूप स्ट्राँग आहेस', शिल्पाच्या बाजूने उभा राहिला आर माधवन

‘तु खूप स्ट्राँग आहेस’, शिल्पाच्या बाजूने उभा राहिला आर माधवन

Related Story

- Advertisement -

पॉर्न फिल्म निर्मिती आणि पॉर्न अॅप प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. नुकतीच राजच्या कोठडीत वाढ करण्यात आली. या याप्रकरणी आता शिल्पाला वैयक्तिक आयुष्यातही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर शिल्पाला मोठ्याप्रमाणात ट्रोल केलं जातंय. यावरुन शिल्पाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. यात तिने म्हटले की, माझ्या मुलांच्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात विचार झाला पाहिजे. यानंतर बॉलिवूडमधूनही काही कलाकार शिल्पाच्या बाजूने उभे राहत आहेत. नुकताचं बॉलिवूड अभिनेता आर माधवन शिल्पाच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. आर माधवनने ट्वीटरवर शिल्पाच्या समर्थनार्थ एक पोस्ट करत तिचे धैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

आर माधवनचा शिल्पाला सपोर्ट

शिल्पा शेट्टीने नुकतचं एक स्टेटमेंट जाहीर करत सांगितले की, ‘या कठीण काळात तिच्या लोकांकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत?” यावर चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले. या स्टेटमेंटवर आर माधवननेही एक कमेंट करत लिहिले की, ‘तु अशा काही ठरावीक लोकांमधील एक आहेस ज्यांना मी सगळ्यात स्ट्रँग मानतो. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की, तु आयुष्यातील .हे संकटही सुखरुप पार करशील. माझ्या प्रार्थना तुझ्या आणि तुझ्या कुटुंबियांसोबत नेहमी असतील.’

- Advertisement -

शिल्पाचे  स्टेटमेंट

यापूर्वी शिल्पा शेट्टीने आपल्या नोटमध्ये लिहिले की, ‘गेली काही दिवस माझ्यासाठी खूप कठीण दिवस होते. माझ्याविरोधात अनेक आरोप करण्यात आले तसेच अफवा पसरवण्यात आल्या. मीडिया आणि प्रसिद्धी माध्यमांनी अनेक आरोप केलेत. तसेच मला आणि माझ्या कुटुंबियांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आल्या. मी यावर काहीच वक्तव्य केलं नाही मी शांत आहे. त्यामुळे माझ्या नावाने खोट्या बातम्या पसरवणे बंद करा.”


- Advertisement -

 

- Advertisement -