HomeमनोरंजनR Madhavan : माधवनने केला आमिर खानच्या विचित्र सवयीचा खुलासा, म्हणाला माझ्यासाठी...

R Madhavan : माधवनने केला आमिर खानच्या विचित्र सवयीचा खुलासा, म्हणाला माझ्यासाठी हे अशक्य

Subscribe

आमिर खान हा सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. सिनेविश्वातील अनेक कलाकारांसोबत त्याची चांगली गट्टी आहे. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता आर माधवन. 'थ्री इडियट्स'च्या निमित्ताने हे दोन हरहुन्नरी कलाकार आपण मोठ्या पडद्यावर एकत्र पाहिले. दोघांची मैत्री इतकी जबरदस्त आहे की, एकमेकांच्या चांगल्या वाईट सवयींबद्दल ते दोघेही जाणतात. दरम्यान, मॅडीने एका मुलाखतीत आमिर खानबद्दल बोलताना त्याची एक विचित्र सवय सांगितली आहे. ही सवय नेमकी काय आहे? याविषयी जाणून घेऊया.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खान हा सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. सिनेविश्वातील अनेक कलाकारांसोबत त्याची चांगली गट्टी आहे. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता आर माधवन. सुपरहिट सिनेमा ‘थ्री इडियट्स’च्या निमित्ताने हे दोन हरहुन्नरी कलाकार आपण मोठ्या पडद्यावर एकत्र पाहिले. दोघांची मैत्री इतकी जबरदस्त आहे की, एकमेकांच्या चांगल्या वाईट सवयींबद्दल ते दोघेही जाणतात. दरम्यान, मॅडीने एका मुलाखतीत आमिर खानबद्दल बोलताना त्याची एक विचित्र सवय सांगितली आहे. ही सवय नेमकी काय आहे? याविषयी जाणून घेऊया. (R Madhavan reveal Aamir Khans secret habit)

आमिर खानची विचित्र सवय

अभिनेता आर. माधवनने एका मुलाखतीत आमिर खानचे आवर्जून नाव घेतले आहे. त्याच्याविषयी सांगताना माधवन म्हणाला, आमिर कुठेही बाहेर जाताना स्वतःसोबत पॉकेट घेऊन जात नाही. कारण, त्याने पैसे देण्यासाठीसुद्धा माणसं रुजू केली आहेत. तो या माणसांना पैसे देण्याचे पैसे देत असेल, ही गोष्ट वेगळी. खरंतर त्याचं स्टारडम त्याला अशा वर्तनाची अनुमती देतं. मात्र, मी बिना पॉकेट अजिबात बाहेर जाऊ शकत नाही. माझ्यासाठी हे अशक्य आहे. माझा स्वभाव मला या गोष्टीसाठी परवानगी देत नाही’.

अभिनेता पुढे म्हणाला, ‘मी एकटं चालण्यावर जास्त विश्वास ठेवतो. मला ते स्वातंत्र्य हवं आहे आणि ती कलासुद्धा यायला हवी ज्यात मी इतर लोकांशी संवाद साधू शकेन. शिवाय गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करणे मला अजिबात मान्य नाही. त्यामुळे मी माझ्या बजेटच्या हिशोबानेच वस्तूंची खरेदी करतो. यामुळे पैसे वाया जात नाहीत आणि गरजाही वेळेवर पूर्ण होतात’.

अभिनेता आर. माधवनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अलीकडेच त्याचा ‘हिसाब बराबर’ हा सिनेमा डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म Zee5 वर हा सिनेमा पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अश्विनी धारने केले आहे. ज्यात अभिनेता माधवनसोबत निल नितीन मुकेश आणि अभिनेत्री किर्ती कुल्हारी महत्वाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय आगामी काळात अभिनेता माधवनचा ‘दे दे प्यार दे 2’ हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये तो अभिनेता अजय देवगणसोबत मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे.

हेही पहा –

Lata Mangeshkar : कामावर निष्ठा असावी तर अशी, गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी 8-10 तास उभ्या होत्या लता दीदी