जगातल्या सर्वात मोठ्या बिलबोर्ड टाइम्स स्क्वायरवर आर माधवनच्या ‘रॉकेट्री’ चित्रपटाचे ट्रेलर लाँच

या चित्रपटाच्या ट्रेलरला जगातल्या सर्वात मोठ्या बिलबोर्ड टाइम्स स्क्वायरवर रविवारी प्रदर्शित करण्यात आलं

कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये कमाल केल्यानंतर आर माधवन यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या ‘रॉकेट्रीः द नंबी इफेक्ट’ चित्रपटाने अजून एक जबरदस्त कमाल केली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला जगातल्या सर्वात मोठ्या बिलबोर्ड टाइम्स स्क्वायरवर रविवारी प्रदर्शित करण्यात आलं. यासंबंधीत अभिनेता आर माधवनने नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आर माधवनने व्हिडीओ शेअर करत खाली कॅप्शनमध्ये लिहिले की, “टाइम्स स्क्वायरच्या नैस्डैक बिलबोर्ड वर रॉकेटचे ट्रेलर लॉंच”. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तिथल्या एका खुर्चीवर नंबी नारायण बसले आहेत त्यांच्या बाजूला आर माधवन उभे आहेत. तसेच आजूबाजूलाही अनेक लोक उभे आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटाबाबत उत्सुक असलेल्या आर माधवन यांनी म्हणटंल की, “हे सगळं खूप खरं आहे! वेळ एवढ्या लवकर निघून गेला. असं वाटतं की आम्ही कालचं या चित्रपटाचे शूटिंग करत होतो आणि आता आम्ही इथे आहेत. देवाच्या कृपेने आत्तापर्यंत मिळालेल्या प्रेमासाठी आणि आर्शिवादासाठी मी खूप आभारी आहे”.

आर माधवन आणि इसरो वैज्ञानिक नंबी नारायण १२ दिवसांसाठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टूर वर आहेत. या दरम्यान, त्यांनी टेक्सास जर्नीवर अंतरिक्ष यात्री सुनिता विलियम्स यांची सुद्धा भेट घेतली. या प्रमोशनमध्ये शिकागो, डलास, एरिजोना,लॉस एंजिल्स यांसारख्या अनेक ठिकाणांची भेट घेतील.

 


हेही वाचा:ड्रग्स प्रकरणी शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूरला अटक