‘रानबाजार’ चा स्पेशल ट्रेलर फक्त फॅन्ससाठी

या वेब सिरीजचा टिझर पाहतानाच एक चित्तथरारक अनुभव प्रेक्षकांना मिळतो. त्यामुळे संपूर्ण वेब सिरीज पाहण्याची इच्छा प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे ही वेब सिरीज सत्य घटनेवर आधारित आहे. यामध्ये कधीही ना पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे.

दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी रेगे आणि ठाकरे या चित्रपटातून ज्वलंत आणि संवेदनशील विषय प्रेक्षकांसमोर अत्यंत उत्तमपणे मांडले. अभिजित पानसे पुन्हा एकदा नवा विषय घेऊन येत आहेत. ‘रानबाजार’ ही मराठी वेब सिरीज घेऊन अभिजित पानसे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘रानबाजार’ या वेब सिरीजची निर्मिती प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनीने केली आहे. नुकतेच या वेब सिरीजचे पोस्टर आणि टिझर सोशल मीडियावरून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्या मुख्य भूमिका आहेत. दहा भागांची असलेली रानबाजार ही वेब सिरीज २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजचा पोस्टर आणि टिझर प्रदर्शित झाला आहे. तर  १८ मे रोजी ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. मुख्य म्हणजे हा ट्रेलर डिजिटली प्रदर्शित होणार असून तो फक्त फॅन्ससाठी असणार आहे.

या वेब सिरीजचा टिझर पाहतानाच एक चित्तथरारक अनुभव प्रेक्षकांना मिळतो. त्यामुळे संपूर्ण वेब सिरीज पाहण्याची इच्छा प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे ही वेब सिरीज सत्य घटनेवर आधारित आहे. यामध्ये कधीही ना पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे. मराठी वेब सिरीज विश्वातला आणि मराठी प्रेक्षकांसाठी हा नक्कीच आगळा वेगळा प्रयोग ठरणार आहे.

‘आज सर्वांना ग्लोबल कॉन्टेन्ट सहज उपलब्ध आहे. तसे पाहिले तर भाषेचा अडथळा हा प्रामुख्याने कधीच पार झाला आहे. त्यामुळे एका सशक्त विषयाची मांडणी उत्तमरीत्या केली तर ती नक्कीच लोकांना आवडेल, ती सर्वदूर पोहोचेल असा विश्वास मला वाटला. मराठीतल्या सर्वार्थाने मोठ्या अशा ‘रानबाजार’ची निर्मिती झाली. यात राजकारण आहे, गुन्हेगारी आहे, याशिवाय थरारही आहे. या तीनही गोष्टी प्रेक्षकांना एकाच वेळी अनुभवता येणार आहेत. अशा काही गोष्टींवर भाष्य केले गेले, ज्या कदाचित आधी घडून गेल्या असतील. हा एक वादग्रस्त आणि बोल्ड विषय आहे. अनेक गोष्टी ‘रानबाजार’ पाहिल्यावरच उलगडतील. विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आतापर्यंतच्या काॅन्टेन्टमध्ये हा सर्वोत्कृष्ट कन्टेन्ट असणार आहे असे काही जाणकारांनी म्हटले, असे असे दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी सांगितले.

या वेब सिरीज मध्ये कलाकार सुद्धा खूप उत्तम असून त्यांनी काम सुद्धा खुप उत्तम केलं आहे. वेब सिरीजचा जो विषय आहे त्यात जो थरारक अनुभव प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. त्याच्या तोडीचे काम हे कलाकारांकडून झाले आहे. त्याचप्रमाणे अभिजित पानसे यांनी यांनी आतापर्यंत जे विषय हाताळले आहेत. त्याला तोड नाही ते उत्तमच आहेत. आणि जेव्हा अभिजित पानसेंनी मला रानबाजारविषयी सांगितले तेव्हा मी लगेच होकार सुद्धा दिला. आजपर्यंत ओटीटीवर अशा पद्धतीचा कन्टेन्ट प्रेक्षकांना कधीच पाहायला मिळाला नसेल आणि तो पण मराठीमध्ये. अशा पद्धतीची वेब सिरीज ओटीटीवर या पूर्वी प्रदर्शित झाली नव्हती. असे प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले.