घरताज्या घडामोडीRachel Shelley : 'लगान'मधली गोरी मॅम आहे एवरग्रीन, आजही दिसते जशीच्या तशी

Rachel Shelley : ‘लगान’मधली गोरी मॅम आहे एवरग्रीन, आजही दिसते जशीच्या तशी

Subscribe

लगान हा चित्रपट केवळ अमिर खानसाठीच खास ठरला नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीसाठीही मैलाचा दगड ठरला. दुष्काळग्रस्त भागात दुसऱ्यांच्या शेतात राबवण्याचा शाप मिळालेल्या शेतकऱ्यांचे  क्रिकेट खेळताना पाहणेआजही प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारे आहे. यातच या चित्रपटाच्या शेवटी देण्यात आलेला मेसेज आजच्या परिस्थितीला साजेसा आहे. 

दररोज नवनवीन चित्रपट हे रिलिज होत असतात. मात्र असे काही चित्रपट असतात जे रिलीज झाले तरी बऱ्याचदा  प्रेक्षकांच्या मनात घर करुन असतात. त्यापैकीच एक म्हणजे ‘लगान’ सिनेमा होय. लगान हा सिनेमा 2001 मध्ये रिलीज झाला. मात्र, अजूनही या सिनेमाचे असंख्य चाहते आहेत. या सिनेमातून अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री ग्रेसी सिंहने आपल्या अभिनयाने चाहत्याचे मन जिंकले. मात्र, या दोघांशिवाय या सिनेमामध्ये एक अशी अभिनेत्री होती. जिच्या अभिनयाने, वेगळ्या अंदाजाने आणि अगदी तिच्यातील नम्रतेमुळे चाहत्यांना वेड लावले होते. ही अभिनेत्री म्हणजे लगानमधील ‘अंग्रेजी मेम’ ज्यांनी सर्व गावांना मदतीचा हात दिला. सिनेमातील ‘अंग्रेजी मेम’ म्हणजेच एलिजाबेथ रसेल उर्फ रशेल शैलेने व्यक्तीरेखा साकारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by rachel shelley (@rachelshelley)

- Advertisement -

रशेल शैलेची सिनेमातील व्यक्तीरेखा सर्वांनाच पसंतीस आली होती. दरम्यान, त्यांचे अनेक फोटो सोशलमिडियावर मोठ्या प्रमामात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तिने बेबी पिंक कलरचा जॅकेट परिधान केला आहे. त्यात तिचा लूक बराच ग्लॅमरस वाटत आहे. चाहत्यांना या फोटोंमुळे भुरळ पाडली आहे. एका चाहत्याने कमेंट केली की, ‘तुम्ही तर 16 वर्षाच्या वाटत आहेत.’ तर दूसऱ्याने ‘ब्यूटीफूल’ अशा कमेंट केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by rachel shelley (@rachelshelley)

- Advertisement -

माहितीनुसार, रशेल शैले बॉलीवूड चित्रपटांमध्ये फक्त लगान सिनेमातच दिसली होती. तिने इंस्टाग्राम हँडलवर लगान चित्रपटाचे काही फोटोही शेअर केले आहेत. रशेल शैले केवळ अभिनय करत नाही तर ती एक मॉडेल आणि लेखिका देखील आहे.

लगान हा चित्रपट केवळ अमिर खानसाठीच खास ठरला नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीसाठीही मैलाचा दगड ठरला. दुष्काळग्रस्त भागात दुसऱ्यांच्या शेतात राबवण्याचा शाप मिळालेल्या शेतकऱ्यांचे  क्रिकेट खेळताना पाहणेआजही प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारे आहे. यातच या चित्रपटाच्या शेवटी देण्यात आलेला मेसेज आजच्या परिस्थितीला साजेसा आहे.


हे ही वाचा – रणवीर सिंह, विक्की कौशल की रणबीर ? ‘लगान’ रिमेकसाठी अमिरची कोणाला पसंती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -