घरमनोरंजनNude video घटनेची सल मनात ११ वर्षांनीही, राधिकाने ४ दिवस कोंडून घेतले...

Nude video घटनेची सल मनात ११ वर्षांनीही, राधिकाने ४ दिवस कोंडून घेतले होते

Subscribe

राधिका आपटे ही बॉलिवूडमधील टॉपटेन अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत अनेक अनोख्या भूमिका साकारल्या आहेत. याचदरम्यान, राधिकाचा एका न्यूड व्हिडिओ लीक सोशल मीडियावर झाल्याने ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. सोशल मीडियाच्या माध्यामातून तिला बरेच ट्रोल केले गेले. परंतु या घटनेची राधिकाला ११ वर्षांनी पुन्हा आठवण झाली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत राधिकान न्यूड व्हिडिओ लीक झाल्यानंतर माझ्या एकंदरीत जीवनावर त्याचा खूप वाईट परिणाम झाला होता असे म्हणत दु:ख व्यक्त केले. या घटनेनंतरच मी माझ्या शरीराबाबत अधिक कॉन्फिडंट झाल्याचेही राधिकाने एका मुलाखतीत म्हटले आहे.

जेव्हा न्यूड व्हिडिओ लीक झाला तेव्हा

राधिका म्हणाली की, जेव्हा माझा न्यूड व्हिडिओ लीक झाला तेव्हा त्या व्हिडिओमधील तिला तिच्या ड्रायव्हरपासून ते वॉचमनपर्यंत साऱ्यांनी ओळखले होते. एका मॅग्जीनला दिलेल्या मुलाखतीत राधिका म्हणाली की, माझ्या ‘क्लीन शेव’ या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान माझी न्यूड व्हिडिओ क्लिप लीक झाली तेव्हा मला खूप वाईटप्रकारे ट्रोल करण्यात आले आणि याचा खूप वाईट परिणाम माझ्या एकंदरीत जीवनावर झाला. मी चार दिवस स्वत:ला घरात कोंडून घेतले.  मीडियामध्ये माझ्याबद्दल जे बोलले जात होते त्या कारणामुळे नव्हे तर माझ्या ड्रायव्हर, वॉचमन आणि माझ्या स्टायलिस्टच्या ड्रायव्हरनेही मला त्या फोटोंमध्ये ओळखले होते.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

- Advertisement -

यावर विचार करणे म्हणजे वेळा वाया घालवणे

राधिका पुढे म्हणाली ‘या सर्व दुर्लक्ष करणेच योग्य आहे. यावर विचार करणे म्हणजे आपला वेळ वाया घालवण्यासारखे आहे. म्हणून जेव्हा मी “पार्च्ड” चित्रपटासाठी शरीरावरील कपडे उतरवले तेव्हा मला समजले की आपल्याकडे लपवण्यासारखे काहीच नाही. ‘

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

- Advertisement -

न्यूड सीन देणे सोप्पे नाही

“पार्च्ड” चित्रपटातील न्यूड सीनवर बोलताना राधिका म्हणाली की, ‘न्यूड सीन देणे सोपे नव्हते कारण त्यावेळी मी माझ्या शरीराच्या समाजातील प्रतिमेशी झगडत होते. ऑनस्क्रीन न्यूड होणे एकप्रकारे माझ्यासाठी भीतीदायक होते. परंतु आता मी हे कुठेही करू शकते. ‘ती पुढे म्हणते की ‘अर्थात हा चित्रपट बर्‍याच ठिकाणी पोहचला आणि माझ्या कामाचे कौतुकही झाले. मला या प्रकारच्या कामाची खरोखरच गरज आहे कारण आपण बॉलीवूड असतो तेव्हा आपल्या शरीराबरोबर काय करावे याबद्दल सतत सल्ला दिला जातो. मला नेहमी वाटायचं की मी कधीही माझ्या शरीर किंवा चेहऱ्यामुळे काहीच करु शकणार नाही. दरम्यान राधिकाच्या वर्कफ्रिंटबद्दल सांगयचे तर राधिकाचा ‘ओके कम्प्यूटर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -