HomeमनोरंजनRadhika Apte : राधिका आपटे झाली आई

Radhika Apte : राधिका आपटे झाली आई

Subscribe

अभिनेत्री राधिका आपटे आई झाली आहे. लग्नाच्या 12 वर्षानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिने तिच्या या लिटिल एंजलसोबत एक सुंदर फोटो शेअर करत याबद्द्लची माहिती दिली.

बॉलिवूडची प्रतिभावान अभिनेत्री राधिका आपटे लग्नाच्या 12 वर्षांनंतर पहिल्यांदाच आई झाली आहे. नुकताच तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्रीने तिच्या एका फोटोद्वारे याचा खुलासा केला आहे. तिने सोशल मीडियावर एक फोटो तिच्या चाहत्यांसह शेअर केला आहे. फोटोमध्ये ती तिच्या छोट्या बाळाला स्तनपान करताना दिसत आहे.

आपल्या मुलीसोबतचा पहिला फोटो शेअर करत राधिका आपटेने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, तिच्या मुलीच्या जन्माला एक आठवडा झाला आहे. तिने आपल्या मुलीच्या जन्माच्या तारखेचा उल्लेख केला नसला तरी, तिने आपल्या पोस्टमध्ये सांगितलंय की ती आपल्या मुलीच्या जन्मानंतर एका आठवड्यानंतर कामावर परतली. तसं पाहता राधिकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती बेडवर बसून आपल्या नवजात मुलीला दूध पाजत आहे आणि लॅपटॉपवर कामही करत आहे.

- Advertisement -

आपल्या मातृत्वाच्या नव्या जीवनाची सुरुवात करताना राधिकाने इंस्टाग्रामवर सांगितले की, तिच्या मुलीच्या जन्मापासून ती कामात व्यस्त आहे. फोटोमध्ये ती तिच्या प्रियकरासोबत तिच्या मांडीवर बसलेली आहे.

तिने कॅप्शनमध्ये लिहिले – “मी माझ्या एका आठवड्याच्या मुलीच्या जन्मानंतर पहिल्या कामाच्या मीटिंगमध्ये सहभागी होत आहे. तिने हॅशटॅग वापरत पु़ढे लिहिले आहे की ‘इट्स अ गर्ल’, ‘गर्ल्स आर द बेस्ट’.

- Advertisement -

अभिनेते विजय वर्मा, टिस्का चोप्रा, झोया अख्तर, दिव्येंदू, कोंकणा सेन शर्मा आणि मोना सिंग यांच्यासह अनेक कलाकारांनी अभिनेत्रीच्या या पोस्टवर कमेंट करून तिचे अभिनंदन केले आहे. तसेच तिच्या चाहत्यांनीही तिच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

‘बदलापूर’, ‘अंधाधुंद’, ‘रात अकेली है’, ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ आणि ‘पॅडमॅन’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमधून राधिकाने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली. तिने तिचा दीर्घकाळ असलेला बॉयफ्रेंड बेनेडिक्ट टेलर याच्याशी 2012 साली लग्न केले. आता लग्नाच्या 12 वर्षांनंतर या दोघांनी एका गोंडस परीला जन्म दिला आहे.

हेही वाचा : Vinod Kambli : सचिन तेंडुलकर सोबतच्या नात्यावर विनोद कांबळीकडून खुलासा; म्हटले…


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -