घरमनोरंजनRadhika Apte : 'तेलुगू इंडस्ट्री पुरुषप्रधान...',राधिका आपटेनं टॉलिवूडवर साधला निशाणा

Radhika Apte : ‘तेलुगू इंडस्ट्री पुरुषप्रधान…’,राधिका आपटेनं टॉलिवूडवर साधला निशाणा

Subscribe

अभिनेत्री राधिका आपटेला तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. तिने मराठी, हिंदी यासह तेलुगू, तमिळ यांसारख्या बहुभाषिक चित्रपटात काम केले आहे. राधिकाने हॉलिवूडमध्येही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. राधिका ही चित्रपटांसोबतच ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. राधिकाच्या तिच्या बोल्ड लूकसह रोखठोक वक्तव्यासाठीही ओळखलं जाते. अशातच आता अभिनेत्रीचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री टॉलिवूडवर (Tollywood) निशाणा साधताना दिसून येत आहे.

राधिका आपटेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

राधिका आपटेचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती पत्रकार राजीव मसंद यांच्यासोबत संवाद साधताना दिसत आहे. दरम्यान तिने तेलुगू सिनेसृष्टीबद्दल भाष्य केलं आहे.
राधिका म्हणते “मला सिनेसृष्टीत सर्वाधिक जास्त संघर्ष हा तेलुगू सिनेसृष्टीत करावा लागला. कारण तेलुगू सिनेसृष्टी ही पितृसत्ताक आणि पुरुषप्रधान आहे. टॉलिवूड पितृसत्ताक आणि पुरुषप्रधान आहे. यातील चित्रपटात महिलेला चांगला दर्जा मिळत असला तरी प्रत्यक्षात सेटवर मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतं. पुरुष कलाकारांचा महिला कलाकारांसोबतचा व्यवहार खूपच वेगळा आहे. कलाकारांकडून महिला कलाकारांना दिली जाणारी वागणूक ही वेगळी असते. तुम्ही ती सहन करु शकत नाही. सेटवर ते कलाकार तुमची विचारपूसही करत नाहीत. अनेकदा सेटवर सांगितले जाते की, अभिनेत्याच्या मूड चांगला नाही, त्याला चहा प्यायची आहे. मला या काळात खूप संघर्ष करावा लागला. पण आता मी हे सर्व सोडून दिले आहे. कारण हे फक्त माझ्याच बाबतीत घडतंय”, असं मला वाटतं, असे विधान राधिका आपटेने यावेळी केले.

पाहा व्हिडीओ :

- Advertisement -

राधिका आपटेवर नेटकरी भडकले

राधिका आपटेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. तेलुगू इंडस्ट्रीला बदनाम करण्याचा प्रयत्न, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने व्हिडीओवर टॉलिवूडला तुझी गरज नाही, टॉलिवूडनेच ‘बाहुबली’, ‘पुष्पा’ आणि ‘अॅनिमल’सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. एक वाईट अनुभव संपूर्ण इंडस्ट्रीबद्दल नसू शकतो. , काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीला चुकीचं ठरवू नये, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

- Advertisement -

राधिका आपटेचा टॉलिवूड प्रवास

राधिका आपटेने 2014-15 मध्ये तेलुगू स्टार नंदामुरी बालकृष्ण यांच्यासोबत दोन टॉलिवूड सिनेमांत काम केलं आहे. ‘लीजेंड’ आणि ‘लायन’ अशी या सिनेमांची नावे आहेत. राधिकाचे हे दोन्ही टॉलिवूडपट सुपरहिट झाले होते. या दोन सिनेमांव्यतिरिक्त अभिनेत्रीने कधीही तेलुगू सिनेमांत काम केलेलं नाही.

राधिकाची सिनेकारकीर्द

दरम्यान राधिका आपटेने मराठी नाटकांमधून सिनेसृष्टीत पदार्पण केले, तामिळ, मराठी, तेलुगू आणि इंग्रजी या भाषांतील सिनेमांत काम केलं आहे. वाह लाईफ हो तो ऐसी, अंतहीन, वेटिंग रुम, रक्तचरित्र, शोर इन द सिटी, कबाली, पॅडमॅन, अंधाधून अशा अनेक सिनेमांत राधिकाच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. राधिकाने सेक्रेड गेम्स या सीरिजमध्ये साकारलेली अंजली माथूर या रॉ एजंटची भूमिका चांगलीच गाजली. अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. काही दिवसांपूर्वीच आलेल्या मेरी ख्रिसमस या चित्रपटातही ती झळकली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -