घरमनोरंजनLockDown: राधिका आपटेचा नवा लूक तुम्ही पाहिलात का?; नक्की बघा!

LockDown: राधिका आपटेचा नवा लूक तुम्ही पाहिलात का?; नक्की बघा!

Subscribe

लॉकडाऊन दरम्यान नवा हेअर कट केला असल्याच्या चर्चा राधिका आपटेच्या चाहत्यांमध्ये सध्या सुरू आहे.

लॉकडाऊनमुळे बॉलिवूड सेलेब्सही त्यांच्या घरात बंदिस्त झाले आहे. लॉकडाऊनदरम्यान ते आपला वेळ घालवण्यासाठी काही ना काही करताना दिसताय. या कलाकार मंडळींपैकी कोणी गाणं गाताना दिसतंय तर कोणी डान्स करताना दिसतंय. अशातच बॉलिवूड विश्वातील बोल्ड अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या राधिका आपटेने लॉकडाऊन दरम्यान नवा हेअर कट केला असल्याच्या चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये सध्या सुरू आहे.

राधिकाने तिचा नवा लूक इंस्टाग्रामवर तिच्या चाहत्यांकरता शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या लहान केसांसह नवीन लुकमध्ये फ्लॉन्ट करताना दिसत आहे. यावेळी राधिकाने कॅप्शनमध्ये असे लिहिले की, “And it’s all gone!!!!!” राधिकाने सोशल मीडियासह इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये तिचा हा नवा लूकदेखील शेअर केला आहे.

- Advertisement -

राधिकाने १७ मे रोजी तिचा एक सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता, ज्यामध्ये ती आपल्या लांब केसांमध्ये दिसली होती. यावेळी राधिकाने असे सांगितले की, लांब केस कमी करण्याची वेळ आली आहे. या फोटोला पोस्ट करताना तिने असे “Going to take a pair of scissors and chop the length. I love how long and healthy my hair has grown. But it’s time to say goodbye!” कॅप्शन दिले होते.

- Advertisement -

राधिका सध्या तिचा पती बेनेडिक्ट टेलरसह लंडनमधील तिच्या घरी आहे. मार्च महिन्यात महामारीच्या काळात तिने भारत ते ब्रिटन या प्रवासात वास्तव्य करण्यासाठी परदेशातून प्रवास केल्याचा अनुभवही तिने शेअर केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -