Radhika Merchant Birthday Bash Video: अंबानी घराण्याची धाकटी सून राधिका मर्चंट नेहमीच चर्चेत असते. राधिकाने मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्याशी लग्न केले आहे. 12 जुलैला दोघांनी शाही विवाहसोहळ्यात लग्नगाठ बांधली. गुरुवारी ( 17 ऑक्टोबरला ) राधिका मर्चंट हिचा 30 वा वाढदिवस होता. लग्नानंतरचा राधिकाचा पहिला वाढदिवस अँटिलियामध्ये मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
अंबानी यांच्या एंटीलिया हाऊसमध्ये सून राधिकाचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी घरातले सगळे कुटुंबिय उपस्थित होते. या पार्टीत बॉलिवूडचे सर्व स्टार्स सहभागी झाले होते. तर क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीही देखील या बर्थडे पार्टीसाठी आला होता. तसंच शाहरुख खानची लेक सुहाना खान , रणवीर सिंग, जान्हवी कपूर, वीर पाहाडिया तसंच अनन्या पांडे यांनाही राधिकाच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावली होती. दरम्यान, राधिकाच्या ग्रँड बर्थ डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लिब्रिटी फोटोग्राफर ‘मानव मंगलानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये राधिकाने पांढऱ्या बॅकलेस टॉपसह रेड स्कर्ट परिधान केला आहे. त्यावर तिने सिंपल पोनी बांधला आहे. तसेच नो मेकअप लूकमध्ये राधिका अतिशय सुंदर दिसत आहे. व्हिडिओमध्ये राधिका आधी केक कापताना आणि नंतर एक-एक करून सर्वांना खाऊ घालताना दिसत आहे. या खास सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यां नी तिचे तोंडभरुन कौतुक केले आहे.
राधिका मर्चंट आहे तरी कोण?
राधिका मर्चंट ही एनकोर हेल्थकेअरचे संस्थापक वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची धाकटी लेक आहे. तिचा जन्म 18 डिसेंबर 1994 रोजी झाला. राधिकानं तिचं शालेय शिक्षण कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल, इकोल मोंडियाल वर्ल्ड स्कूलमधून पूर्ण केलं.
Edited By : Nikita Shinde