राहुल-दिशाने बांधली लग्नगाठ, लग्नसोहळ्याचे काही खास क्षण पाहा

Rahul-Disha tied the knot, see some special moments in the wedding ceremony
राहुल-दिशाने बांधली लग्नगाठ, लग्नसोहळ्याचे काही खास क्षण पाहा

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर बिग बॉस फेम राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे. दोघांचं लग्न कधी होणार यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अशातच राहुल-दिशाने त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करताच चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.आता राहुल आणि दिशाचा नुकताच विवाह सोहळा थाटामाटत पार पडला आहे. सोशल मीडियावर दोघांच्याही लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांसोबत राहुल आणि दिशा या दिवसाची प्रतिक्षा करत होते. सध्या त्यांच्या लग्नातील पारंपारीक विधीला सुरवात झाली आहे.दोघांनी या स्पेशल दिवशी अत्यंत सुंदर पेहराव केल्याचे दिसत आहे. लाल रंगाच्या लेहग्यांमध्ये दिशा अत्यंत सुंदर नववधू दिसत आहे. तसेच राहुलने क्रिम कलरची शेरवानी परीधान केली असून त्यावर गोल्डन कलरचं वर्क करण्यात आलं आहे. दोघही लग्नाच्या जोड्यामध्ये खुपच सुंदर दिसत आहे. अशा प्रतिक्रीया चाहत्यांनी दिल्या आहेत.(Rahul-Disha tied the knot, see some special moments in the wedding ceremony)

 यापुर्वी अनेकदा दोघांच्या लग्नाच्या तारखेत अडचणी आल्या होत्या. राहुल वैद्यने ई-टाईम्समध्ये दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितले होते की, ‘त्यांनी कोरोना व्हायरसमुळे फक्त २५ लोकांच्या उपस्थितीत लग्न उरकण्याची परवानगी दिल्यामुळे त्यांनी अनेकदा लग्नाची तारीख पुढे ढकलली होती.

लग्नामध्ये सर्व मित्रपरिवार उपस्थित राहण्यासाठी त्यांनी लग्नाची तारीख रद्द केल्याचे स्पष्ट केले होते.’ पण आता दोघांचेही लग्न सुखरूप पार पडल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेक कलाकारांनी राहुल आणि दिशाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहे.हे हि वाचा – T-Seriesचे मालक भूषण कुमार यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल !