Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन राहुल वैद्य आणि दिशाला तृतीयपंथीयानी दिला आशिर्वाद, शगुणसाठी घेतले सव्वा लाख

राहुल वैद्य आणि दिशाला तृतीयपंथीयानी दिला आशिर्वाद, शगुणसाठी घेतले सव्वा लाख

राहुल आणि दिशाला आशिर्वाद देण्यासाठी तृथीयपंथी त्यांच्या घरी आले होते.

Related Story

- Advertisement -

 

बिग बॉस 14 फेम सिंगर राहुल वैद्य  (Rahul Vaidhya) आणि दिशा परमार (Disha Parmar)या पॉवर कपलचा काही दिवसापुर्वीच धुमधडाक्यात विवाह सोहळा संपन्न झाला. दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर प्रचंड रंगली होती. राहुल-दिशाने त्यांच्या लग्नातील प्रत्येक क्षण चाहत्यांसोबत शेअर करत अनेक व्हिडिओ तसेच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. एकंदरीतच चाहत्यांनी लग्नाला ऑनलाईन उपस्थिती लावली होती असे म्हणायला हरकत नाही. राहुल आणि दिशा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोघांचाही एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये राहुल-दिशाला तृतीयपंथी आशिर्वाद देताना दिसत आहे.(rahul vaidya and disha parmar showerd with blessing from kinnars)तसेच दोघेही आनंदाने नाचताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

राहुल-दिशाला मिळाला तृथीयपंथीयांचा आशिर्वाद

- Advertisement -

राहुल आणि दिशाला आशिर्वाद देण्यासाठी तृथीयपंथी त्यांच्या घरी आले होते. तसेच त्यांनी या नववधू-वराची आरती करत त्यांची नजर काढली. इतकंच नाही तर ते पुढे म्हणाले ‘जैसी बहू आई है वैसी ही बधाई भी लेंगे.’ यानंतर त्यांनी राहुलजवळ तब्बल सवा लाख रुपये आणि सोन्याची वस्तू शगुण म्हणून मागितली. तसेच आत्तापर्यंत आम्ही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी नववधू-वराला आशिर्वाद देण्यासाठी गेलो आहोत. यामध्ये अमिताभ बच्चन,कपिल शर्मा यांचा सुद्धा समावेश आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

व्हिडिओ पाहा- 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


- Advertisement -

हे हि वाचा – कारगिल हीरो विक्रम बत्रावर आधारित ‘शेरशाह’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

- Advertisement -