Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन राहुल वैद्य-दिशा परमार होणार आई बाबा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

राहुल वैद्य-दिशा परमार होणार आई बाबा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी दिशा पारमार आणि राहुल वैद्य लवकरच आई-बाबा होणार आहेत. नुकत्याच काही तासांपूर्वी या दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी सांगितली. ही बातमी पाहून अनेक कलाकार आणि चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disha Parmar Vaidya (@dishaparmar)

गुरुवारी 18 मे रोजी या जोडीने काळ्या पोशाखात मम्मी आणि डॅडीचा बोर्ड घेऊन पोज देतानाचा एक फोटो शेअर केला. तर दुसरीकडे, दिशा परमारच्या सोनोग्राफीचे फोटो आहे. तर एका व्हिडिओमध्ये सोनोग्राफी दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना, या जोडप्याने लिहिलंय की, “आई, बाबा आणि बाळाकडून हॅलो,” त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

कोण आहे दिशा परमार?
- Advertisement -

राहुल वैद्य और दिशा परमार का वेडिंग फोटो देख फैन्स हैरान, सोशल मीडिया पर फोटो पोस्ट कर लिखा 'नई शुरुआत' | True or False : Fans surprised to see wedding photo of

दिशा परमारने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती, त्यानंतर तिने ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ या हिंदी टीव्ही मालिकेत मुख्य भूमिका साकारली. तसेच नंतर ती टीव्ही मालिका ‘बडे अच्छे लगते हैं 2’ मध्ये दिसली होती. तर तिचा पती राहुल वैद्य इंडियन आयडॉलमुळे प्रसिद्ध झाला. शिवाय तो ‘खतरों के खिलाडी 11’ आणि ‘बिग बॉस 14’ मध्ये चा भाग होता, ज्यामध्ये त्याने उपविजेतेपद पटकावले. 2021 मध्ये दोघांचं लग्न झालं होतं.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘तितली’मध्ये अभिनेता वत्सल सेठ दिसणार महत्वपूर्ण भूमिकेत

- Advertisment -