राहूल-दिशाचा हनिमूनचा प्लॅन ठरला! ‘इथे’ जाणार हनिमूनला

Rahul Vaidya has no honeymoon plans yet with Disha Parmar: 'After the wedding, we just want to relax'
राहूल-दिशाचा हनिमूनचा प्लॅन ठरला! 'इथे' जाणार हनिमूनला

बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेले टेलिव्हिजन कपल म्हणजे राहूल वैद्य आणि दिशा परमार. सध्या यांच्या लग्नाबद्दल खूप चर्चा रंगली आहे. १६ जुलैला हे क्यूट कपल लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे सध्या राहूल आणि दिशाच्या लग्नाची तयार जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चे दरम्यानच राहूल वैद्यने लग्नानंतर हनिमून प्लॅन कुठे असणार आहे? याबाबत एक मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

टाईम्स ऑफ इंडियासोबत बातचित करताना राहूल वैद्यला हनिमून प्लॅनबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी राहूलने मजेशीर अंदाजात असे उत्तर दिले की, ‘आम्ही हनिमूनसाठी लोणावळ्याला जाऊ, असे मला वाटते. कारण कोरोनामुळे कुठे दुसरीकडे जाणे कठीण आहे. पण आम्ही कुठेतरी जाण्याचे प्लॅनिंग करत आहोत. बघू. कोणत्या फ्लाईट कुठे-कुठे सुरू आहेत आणि व्हिजा मिळतो की नाही हे माहित करून घ्यायचे आहे. मात्र अजून आम्ही कुठे जायचे हे ठिकाणी ठरवले नाही आहे.’

राहूल पुढे म्हणाला की, ‘लग्नानंतर आम्ही एक आठवडा आराम करू. कारण खूप सारे कमिटमेंट आहेत, ज्या पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर आम्ही हनिमूनला जाऊ. आमचा प्लॅन पहिल्यापासून तयार आहे. आम्ही जेव्हा केव्हा जाऊ तेव्हा युरोप, स्वित्झर्लंड किंवा ऑस्ट्रियाला जाऊ, हे आमचे हनिमून डेस्टिनेशन आहे.’

राहुल नुकताच ‘खतरों के खिलाडी ११’ या रिअॅलिटी शोच्या केपटाऊनमधील शूटिंगहून परतला आहे. राहूल आणि दिशाचे लग्न वैदिक पद्धतीने पार पडणार आहे. या आधीही दोघांच्या लग्नाच्या तारखेत अनेकदा अडचणी आल्या होत्या. राहुल वैद्यने ई-टाईम्समध्ये दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितले होते की, ‘त्यांनी कोरोना व्हायरसमुळे फक्त २५ लोकांच्या उपस्थितीत लग्न उरकण्याची परवानगी दिल्यामुळे त्यांनी अनेकदा लग्नाची तारीख पुढे ढकलली होती. लग्नामध्ये सर्व मित्रपरिवार उपस्थित राहण्यासाठी त्यांनी लग्नाची तारीख रद्द केल्याचे स्पष्ट केले होते.’ आता येत्या १६ जुलैला दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दोघांनी दिली आहे.