Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन काय सांगताय, बबीताजी वयाने ९ वर्षे छोट्या टप्पूला करतेय डेट !

काय सांगताय, बबीताजी वयाने ९ वर्षे छोट्या टप्पूला करतेय डेट !

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ची संपूर्ण टीम दोघांच्या नात्याचा आदर करते. दोघांचीही कोणी थट्टा करत नाही. दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत.

Related Story

- Advertisement -

‘तारक मेहता का उल्टा चष्मा'(Taarak Mehta Ka Ooltah Chashma) ही मालिका छोट्या पडद्यावर(television) गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.(tappu and babitaji dating?) मालिकेचा प्रत्येक भाग खास असतो. या मालिकेत मनोरंजनाबरोबरच एक सामाजिक संदेशही दिला जातो.यामूळे इतर मालिकेपेक्षा  हि मालिका हटके असून टीआरपी रेटमध्ये देखील अव्वल स्थानी आहे. इतकंच नाही तर प्रेक्षकांही मालिकेतील प्रत्येक पात्रावर भरभरुन प्रेम करत आहे.  गोकुळधाम सोसायटीमध्ये जेठालाल, तारक मेहता, भिडे, डॉ हाथी आणि बबिता जी आणि इतर सदस्य आपापल्या कुटुंबासह राहतात.मालिकेत इतकी भली मोठी स्टार कास्ट असून प्रत्येक कलाकार आपल्या चाहत्यांशी कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असतो. दरम्यान, आता सोशल मीडियावर मालिकेतील प्रसिद्ध भूमिका साकारणारी बबीताजी उर्फ मुनमुन दत्ता(munmum dutta) आणि टप्पू (tappu)बद्दल अनेक चर्चांना उधाण आलं आहे. माहितीनुसार दोघेही एमेकांना डेट करत आहे.(Raj Anadkat Aka Tappu And Munmun Dutta Aka Babita Ji Are Dating)

मीडियाने केलेल्या दाव्यानूसार बबीता जी आणि टप्पू रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेत्री मुनमुन दत्ता टप्पू पेक्षा म्हणजेच राज अनादकटपेक्षा(raj anadkat) 9 वर्षांनी मोठी असून अद्याप दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अधीकृतपणे घोषणा केली नाहीये. मात्र सेटवर अनेकदा त्यांच्यात जवळीक वाढल्याचे दिसून येते. एवढेच नाही तर राज बबीताजींच्या प्रत्येक सोशल मीडियापोस्टवर कमेंट देखील करतो. हे पाहून नेकऱ्यांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते नेटकऱ्यांना प्रश्न पडला की दोघांमध्ये काय चालले आहे, पण आता असे दिसते की दोघांचे नाते मैत्रीच्या पलीकडे पोहोचले आहे.

- Advertisement -

तारक मेहता का उल्टा चश्मा फैन क्लब

काही बातम्यांमध्ये असेही म्हटले जात आहे की ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ची संपूर्ण टीम दोघांच्या नात्याचा आदर करते. दोघांचीही कोणी थट्टा करत नाही. दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, सत्य काय आहे, हे फक्त बबीताजी आणि टप्पू सांगू शकतील.


- Advertisement -

हे हि वाचा – कॅटरीना-विक्कीच्या ‘एंगेजमेंट’ च्या बातमीवर सनी कौशलने सोडले मौन म्हणाला…

- Advertisement -