Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन शर्लिन चोप्राला पॉर्न इंडस्ट्रीमध्ये राज कुंद्राने दिलं होतं काम? एका व्हिडीओमागे मिळायचे...

शर्लिन चोप्राला पॉर्न इंडस्ट्रीमध्ये राज कुंद्राने दिलं होतं काम? एका व्हिडीओमागे मिळायचे लाखो रुपये

र्लिनने राज कुंद्रा सोबत 15 ते 20 प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड मधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म चित्रीकरण प्रकरणाबाबत अटक करण्यात आली असून राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रा आणि कंपनीचा आयटी हेड रायन याला देखील पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे आता राज कुंद्राच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आशातच आता 26 मार्च रोजी पोलिसांनी एकता कपूरचं स्टेटमेंट सुद्धा रेकॉर्ड करण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पूनम पांडे आणि शर्लिन चोपडा यांना फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र साइबर सेलमध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.पोलिसांच्या माहितीनूसार अभिनेत्री शर्लिन चोप्राने राज कुंद्रावर तिला पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम दिलं असल्याच स्पष्ट केलं आहे. तसेच शर्लिनला एका प्रोजेक्टसाठी तब्बल 30 लाख रुपये रक्कम देण्यात येत होती. शर्लिनने राज कुंद्रा सोबत 15 ते 20 प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. तसेच पुनम पांडेला तिच्या कामाचा मोबदला न दिल्याने तिने राज कुंद्रावर गुन्हा दाखल केला होता.(raj kundra arrested he brought sherlyn chopra into porn industry)

राज कुंद्राला या प्रकरणात अनेकदा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. आजही कुंद्राला चौकशीसाठी बोलवण्यात आले आणि त्याची साधारण ७-८ तास चौकशी झाली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून उद्या (मंगळवारी) त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. आमच्याकडे कुंद्रा विरोधात पुरावे असल्याचे मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडून सांगण्यात आले.


- Advertisement -

हे हि वाचा –

- Advertisement -